Team Agrowon
सध्या देशासह आंतरराष्ट्रीय बाजारात सोयबीनच्या दरात चढ उतार सुरू आहे.
सोयाबीन बाजारावर आधीपासून खाद्यतेलाचा दबाव राहिला आहे.
केंद्र सरकारने सोयातेलनंतर सुर्यफूल तेलाची शुल्कमुक्त आयातही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे सोयबीन आणि मोहरीच्या दराला आधार मिळण्याचा अंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल दरवाढीचा भडका उडाल्यानंतर देशातही भाव वाढले होते.
त्यामुळे केंद्र सरकारने २० लाख टन कच्चे सोयाबीन आणि २० लाख टन कच्चे सूर्यफुल तेलाच्या शुल्कमुक्त आयातीला परवानागी दिली होती.
दोन वर्षांसाठी ही परवानगी देण्यात आली होती. मात्र मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव कमी झाले आहेत.