Agriculture Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : तुरीतील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, तूर, तसेच कांदा दर काय आहेत?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, तूर आणि उडीद पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातील चढ उतार कायम आहेत. काल मोठ्या प्रमाणता नरमाई आल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात आज काहीशी वाढ झाली होती. सोयाबीनचे वायदे ११.८४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३५७ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात भावपातळी मात्र कायम होती. सोयाबीनचे भाव ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बााजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या वायद्यांमधील नरमाई कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे काल साडेतीन वर्षातील निचांकी पातळीवर पोचले होते. पण आज काहीशी वाढ झाली होती. आज दुपारपर्यंत ७५ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. देशातील बाजारातही वायदे ५७ हजार ६० रुपये प्रतिखंडीवर आले होते. बाजार समित्यांमधील भावपातळी कायम दिसत होती. कापसाचे भाव ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

राज्याच्या अनेक भागात पावसाचे वातावरण आहे. तसेच पाऊसही पडत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक बाजारांमधील कांद्याची सरासरी आवक कमी दिसत आहे. यामुळे कांद्याचे भाव स्थिर दिसत आहेत. चांगल्या कांद्याचा भाव २ हजार ५०० दरम्यान दिसतो. पण सरासरी दरपातळी की ज्या भावात जास्तीत जास्त कांदा विकला जातो तो भाव १७०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे, यापुढील काळातही बाजारातील कांदा आवक कमी होण्याची शक्यता आहे, असे व्यापारी सांगत आहेत. 

तुरीचा बाजारात मागील काही आठवड्यांपासून कायम दिसतो. यंदा उत्पादनात मोठी घट झाल्याने बाजारातील आवकही सरासरीपेक्षा कमी दिसत आहे. पण दुसरीकडे भाजीपाला महाग झाल्याने डाळीला चांगला उठाव मिळत आहे. त्यामुळे तुरीला आधार मिळत आहे. परिणामी तुरीचा बाजारात मागील काही महिन्यांपासून १० हजार ५०० ते ११ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. तुरीचा हा भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून उडदाचे भाव टिकून आहेत. उडदाची बाजाराील आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे मागणी चांगली आहे. सरकारने उडदाचे भाव कमी कऱण्यासाठी अनके निर्णय घेतला. पण तरीही सरकारला अपेक्षेप्रमाणे भाव पाडता आले नाहीत. सध्या उडदाचा भाव ९ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. उडदाच्या भावातील ही तेजी कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Antyodaya Scheme: अहिल्यानगरमधील २७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ

Drought Relief: दुष्काळग्रस्त शेतकरी, मजुरांना तातडीने मदत द्या : बाळासाहेब थोरात

Orange Damage: मृगबहार संत्राफळांचे नुकसान

Soybean Prices: हमीदरापेक्षा भाव वाढले, उत्पादन मात्र घटले

Leopard Attack: बिबट्याचा धुमाकूळ, पंढरपुरात १३ कोकरे, करमाळ्यात ५ मेंढ्या फस्त

SCROLL FOR NEXT