Market Bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : टोमॅटोची लाली उतरलेलीच

Swapnil Shinde

1. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात आठवड्याच्या शेवटी काहिशी वाढ झाली होती. सोयापेंडने ३९० डाॅलरचा टप्पा गाठला होता. तर सोयाबीनचे भाव १२.८५ डाॅलवर पोचले होते. देशातील बाजारातही सोयाबीन काहिसे सुधारले होते. प्रक्रिया प्लांट्सनी आज ४ हजार ७०० ते ४ हजार ८०० रुपयांचा भाव काढला होता. सोयाबीनची भावपातळी आणखी काही दिवसांमध्ये स्थिरावू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

   
2. कापूस वायदे शुक्रवारी वाढीसह बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे ८६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे ४४० रुपयांनी वाढून ५९ हजार १०० रुपयांवर बंद झाले. बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र आजही ६ हजार ३०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावावरील दबाव पुढील काही दिवसांमध्ये दूर होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

3. आल्याचे भाव मागील काही दिवसांपासून काहिसे नरमलेले दिसतात. अनेक बाजारात आले सरासरी ७ हजारांवर आले. तर सरासरी भावपातळी ९ हजारांवर आली आहे. देशातील आले उत्पादन घटले आहे. तर चालू हंगामात आले पिकाला कमी पाऊस आणि वाढलेल्या उष्णतेचा फटका बसत आहे. त्यामुळे आल्याचे भाव स्थिरावण्याची शक्यता आहे, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

4. कोबीची भावपातळी काहिशी नरमली आहे. बाजारातील कोबीची आवक मागील काही दिवसांपासून वाढली आहे. तर कोबीचा उठाव कायम आहे. पण कोबीच्या भावाला आधार मिळाला नाही. सध्या कोबीला प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते ९०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील आवक आणि मागणी पाहता पुढील काही दिवसांमध्ये कोबी भावात काहिशी सुधारणा अपेक्षित आहे, असे व्यापारी सांगतात.

5. टोमॅटोचे बाजारभाव आद्यापही दबावातच आहेत. टोमॅटोची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून आवकही घटलेली दिसते. तसेच काही दिवसांमध्ये टोमॅटोच्या किमान भावपातळीत काहिशी वाढ झाली. पण ही भावपातळी अजही उत्पादन खर्चापेक्षा निम्म्याने कमी आहे. सध्या बाजारात टोमॅटोला प्रतिक्विंटल ६०० ते ९०० रुपयांचा भाव मिळत आहे. यापुढील काळात बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. एकतर पाऊस कमी पडला. त्यानंतर उष्णतेत मोठी वाढ झाली.

ऑक्टोबर हीट विक्रमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यापुढील काळात बाजारातील आवक कमीच राहू शकते. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सरकार टोमॅटोच्या भावावर लक्ष ठेऊन आहे. जुलै महिन्यात टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर सरकार हे भाव कमी करण्यासाठी आक्रमक झाले होते. आयातीचाही निर्णय घेतला होता. पण टोमॅटो लवकर खराब होणारा शेतीमाल आहे. यामुळे जास्त दिवस साठवता येत नाही. पण निडवणुकांच्या तोंडावर सरकार भाववाढीच्या  विरोधात दिसते. मात्र दुसरीकडे कमी पावसामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा आधार टोमॅटोच्या भावाला मिळू शकतो, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goshala Anudan : गोशाळांच्या अनुदानाला राज्य सरकारची मान्यता; अनुदान बँक खात्यावर जमा होणार

Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीची एक लाख हेक्टरला बाधा

Devna Water Project : जलसंजीवनीसाठी ममदापूर, देवना प्रकल्प महत्त्वपूर्ण

Crop Loan : पीककर्ज वाटपात ‘डीसीसी’सोबत स्टेट बँकेचेही आघाडी

Agriculture Science Center : कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा

SCROLL FOR NEXT