Turmeric Farming : सरकार स्थापन करणार राष्ट्रीय हळद बोर्ड, उत्पादक शेतकऱ्यांना फायदा काय?

Central Government : केंद्र सरकारकडून मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली यावेळी राष्ट्रीय हळद मंडळाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली.
Turmeric Farming
Turmeric Farmingagrowon
Published on
Updated on

National Turmeric Board : केंद्र सरकारकडून काल(ता.०४) बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली यावेळी राष्ट्रीय हळद मंडळाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली. याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, २०३० पर्यंत भारत दरवर्षी एक अब्ज डॉलरची हळद परदेशात निर्यात करणार असल्याच्या उद्दीष्ठाने या मंडळाची स्थापना करण्यात आल्याचे ठाकूर म्हणाले.

राष्ट्रीय हळद मंडळाच्या कामकाजाविषयी माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, कोरोना महामारीनंतर जगाला हळदीचे महत्त्व समजले आहे. भारत सरकारलाही त्याचे उत्पादन, वापर आणि निर्यातीला प्रोत्साहन द्यायचे आहे. यासोबतच, राष्ट्रीय हळद मंडळ देशातील हळद आणि हळद उत्पादनांच्या विकासावर आणि वाढीवर लक्ष केंद्रित करणार आहे.

यासोबतच जगभरात हळदीचा खप वाढवण्याची भरपूर क्षमता असून मंडळाच्या मदतीने हळदीबाबत जागरूकता आणि खप वाढवण्याचा विचार सुरू आहे. निर्यात वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन बाजारपेठ विकसित करणे, तसेच हळदीचे संशोधन करणे यासाठी प्रयत्न केले जातील. याचबरोबर नवीन उत्पादने आणि विकासाला चालना देण्याचेही काम केले जाणार असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.

मूल्यवर्धनातून अधिक लाभ मिळविण्यासाठी मंडळ विशेषत: हळद उत्पादकांच्या क्षमता वाढीवर आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच हळदीच्या गुणवत्तेवर भर देण्यासाठी अन्न सुरक्षा विभागाकडून विशेष काळजीही घेण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर मंडळ हळदीला संरक्षण देणार आहे.

मंडळाच्या उपक्रमात हळद उत्पादकांवर लक्ष केंद्रित करून लागवड विस्तारीकरण करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल. संशोधन, बाजार विकास, वाढता वापर आणि मूल्यवर्धन यामधील मंडळाचे उपक्रम हे देखील सुनिश्चित करण्यात येणार आहेत.

Turmeric Farming
Turmeric Export : हळदीच्या उत्पादनासह निर्यातीला मिळणार चालना

मंडळाचे स्वरूप असे असेल

या मंडळामध्ये केंद्र सरकारने नियुक्त केलेले अध्यक्ष, आयुष मंत्रालयाचे सदस्य, केंद्र सरकारचे फार्मास्युटिकल्स, कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, वाणिज्य आणि उद्योग, तीन राज्यांचे वरिष्ठ राज्य सरकारचे प्रतिनिधी संशोधन पथकात राष्ट्रीय/राज्य संस्थांचे प्रतिनिधी, हळद उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार यांचा समावेश असेल आणि वाणिज्य विभागाकडून एका सचिवाची नियुक्त केली जाणार आहे.

हळद उत्पादनाबाबत जगात भारताची ही स्थिती आहे.

भारत हा जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार आहे. २०२२-२३ मध्ये भारतात ३.२४ लाख हेक्टर क्षेत्रात ११.६१ लाख टन (जागतिक हळद उत्पादनाच्या ७५% पेक्षा जास्त) उत्पादनासह हळदीची लागवड करण्यात आली. भारतात हळदीच्या ३० पेक्षा जास्त जाती उगवल्या जातात आणि देशातील २० पेक्षा जास्त राज्यांमध्ये त्याची लागवड केली जाते. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू ही हळदीचे सर्वाधिक उत्पादन करणारी राज्ये आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com