Cotton Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : काही बाजारात तूर ९ हजारांवर

देशातील बाजारात तुरीचे दर चांगलेच तेजीत आहेत. बाजार समित्यांमध्ये सध्याचा काळ तसा आवकेचा आहे.

Anil Jadhao 

१) सोयाबीन दर स्थिरावले (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात सध्या चढ उतार सुरु आहेत. तर सरासरी दरपातळी कायम होती. सोयाबीनचे वायदे १४.२४ डाॅलर प्रतिबुशेल्स तर सोयातेल ५३.६४ सेंट प्रतिपाऊंड आणि सोयापेंडचे वायदे ४४३ डाॅलर प्रतिटनावर आहेत.

तर देशातील बाजारात सोयाबीनचे दर ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांवर टिकून आहेत. देशातील बाजारात सोयाबीन जास्त दिवस दबावात राहणार नाही. दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) कापूस आवकेचा दबाव कायम (Cotton Rate)

देशातील बाजारात कापसाचे भाव नरमलेल्या पातळीवर कायम आहेत. देशात मार्च महिन्यात कापसाची आवक वाढल्यानंतर दर दबावात आले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात बॅंकिंग क्षेत्रातील संकटामुळं कापूस दर कमी झाले.

सध्या कापसाचे वायदे ७७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान आहेत. तर देशात कापसाला ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपये भाव मिळतोय.

देशातील घटते उत्पादन आणि वाढलेला वापर यामुळं आकेचा दबाव कमी झाल्यानंतर दर सुधारु शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) उडदाच्या भावात तेजी (Urad Rate)

तुरीनंतर देशात आता उडदाचे भाव तेजीत आले आहेत. देशात यंदा उडदाच्या उत्पादनात मोठी घट झाली. तर आयातही मर्यादीत राहीली. पण दुसरीकडे उडदाला उठाव चांगला आहे. त्यामुळे उडदाच्या दरात तेजी आली.

सध्या उडदाला सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार रुपये भाव मिळतोय. तसेच उडीद दरातील तेजी पुढील काळातही कायम राहील, असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

४) गवारच्या दरात मोठी वाढ

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून गवारचे दर तेजीत आहेत. बाजारातील गवारची आवक कमी असून उठाव मात्र चांगला मिळतो. सध्या राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये गवारची सरासरी आवक १०० क्विंटलपेक्षा कमीच आहे.

त्यामुळं गवारला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ते ७ हजार रुपये भाव मिळतोय. पुढील काही दिवस गवारची आवक मर्यादीत राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं दरही तेजीत राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

५) सध्या तुरीला काय भाव मिळतोय? (Tur Rate)

देशातील बाजारात तुरीचे दर चांगलेच तेजीत आहेत. बाजार समित्यांमध्ये सध्याचा काळ तसा आवकेचा आहे. पण सध्याची आवक खूपच आहे. त्यातच लग्न सराईमुळे तुरीला चांगला उठाव मिळतोय. देशातील स्थिती लक्षात घेऊन व्यापारीही तुरीची खरेदी करत आहेत.

स्टाॅकीस्टही काही प्रमाणात सक्रिय दिसत आहेत. त्यामुळं तुरीच्या दरात मोठी तेजी आली. सध्या देशातील काही बाजारांमध्ये तुरीने ९ हजार रुपयांचा टप्पा गाठला. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आणि कर्नाटकातील काही बाजारांमध्ये तुरीचे दर या पातळीवर पोचले. हा कमाल भाव होता.

तसचं कमी मालाला मिळाला. पण यातून तूर दराची एक दिशा स्पष्ट होते. सोबतच सरकार बाजारात हस्तक्षेप करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुरीच्या दरात जास्त वाढ झाल्यास सरकार एखादा निर्णय घेऊ शकते.

यापुर्वीच सरकारनं आयात शुल्क काढले, राज्यांकडून स्टाॅकची माहिती घेतली तसचं व्यापारी, स्टाॅकिस्ट आणि मिलर्सना स्टाॅकची माहिती देण्यास सांगितले. पण एवढं करूनही तुरीचे दर तेजीत आहेत.

तसचं सरकारनं यापुढे एखदा निर्णय घेतला तरी तुरीचे दर ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान राहतील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra MPs Protest: कांदाप्रश्नी महाराष्ट्रातील खासदारांचे संसदेच्या प्रांगणात आंदोलन

Onion Farmer Support: कांदाप्रश्नी त्रिसदस्यीय समिती

Farmer Support: आंबा आणि काजू उत्पादकांना हेक्टरी २२ हजार : मुख्यमंत्री

Farmer Expectations: आंबा, काजू बागायतदारांचे शासन निर्णयाकडे लक्ष

Gas Crisis Issue: बायोगॅस ऊर्जेचा पर्याय ठरला वरदान

SCROLL FOR NEXT