Chana Market News
Chana Market News Agrowon
बाजार विश्लेषण

Chana Market : हरभरा दर वाढतील का?

Team Agrowon

अनिल जाधव
पुणेः देशातील बाजारात सध्या हरभऱ्याची आवक (Chana Arriaval) होत आहे. यंदा देशातील हरभरा उत्पादन (Chana Production) कमी राहण्याचा अंदाज आहे.

मात्र मागील हंगामातील शिल्लक साठ्यामुळे हरभरा दरावर (Chana Rate) दबाव येऊ शकतो. त्यामुळे सरकारने लवकर हमीभावाने खरेदी सुरु करण्याची गरज आहे. 

मागील हंगामात देशातील हरभरा उत्पादन वाढले होते. त्यामुळं बाजारात बाजारात पुरवठा वाढून दर दबावात आले.

मागील वर्षभरापासून हरभरा दर दबावात आहेत. पण सध्या अनेक बाजारांमध्ये गुणवत्तापूर्ण हरभऱ्याचा तुटवडा जाणवत आहे.

त्यामुळे गुणवत्तापूर्ण हरभऱ्याचा भाव ५ हजार रुपयांपेक्षा काहीसा वाढला. पण दरात जास्त वाढ होण्याची शक्यता कमीच असल्याचं सांगितलं जातं.

यंदा देशातील हरभरा लागवड कमी झाली. सरकारच्या आकड्यानुसार केवळ दोन टक्के लागवड कमी झाली.

मात्र शेतकरी आणि जाणकारांच्या मते देशातील हरभरा लागवडीतील घट जास्त आहे. त्यामुळं यंदा देशातील हरभरा उत्पादनात घट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हरभरा बाजारातील अभ्यासकांनी यंदा देशातील हरभरा उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला.

काय आहे दरपातळी
देशातील बाजारात सध्या नव्या हरभऱ्याची आवक होत आहे. नव्या मालात ओलावाही काहीसा अधिक येतोय. मात्र गुणवत्ता चांगली असल्याचं व्यापारी सांगत आहेत.

पण या हरभऱ्याला ४ हजार ७०० ते ४ हजार ९०० रुपये दर मिळतोय. यंदा सरकारनं हरभऱ्यासाठी ५ हजार ३३५ रुपये प्रतिक्विंटलचा दर जाहीर केला.

म्हणजेच सध्या बाजारात मिळणारा दर हमीभावापेक्षा कमी आहे.

दराला आधार मिळणार
सध्या हरभऱ्याला किमान दरात उठाव मिळतोय. यंदा  उत्पादन घटीचा अंदाज आत्तापासूनच व्यक्त केला जातोय. त्यामुळं स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादार हरभरा खेरदीत उतरु शकतात.

त्यामुळं हरभरा मागणी वाढेल. त्यातच आता गुजरात सरकारनं हमीभावाने हरभरा खेरदीची प्रक्रिया जाहीर केली.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही हमीभावाने खरेदी सुरु होईल. सरारच्या हमीभाव खरेदीचाही हरभरा दराला आधार मिळेल, असं जाणकारांनी सांगितलं.

हमीभावाने खरेदी सुरु व्हावी
देशात यंदा हरभरा उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. पण तरीही मागील हंगामातील साठाही शिल्लक आहे. त्यामुळं यंदा हरभरा बाजाराला हमीभाव खरेदीचा आधार गरजेचा आहे.

सरकार खरेदीत असल्यास खुल्या बाजारातील भावही हमीभावाच्या दरम्यान राहू शकतात. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारने हमीभावाने हरभरा खरेदी लवकर सुरु करणे गरजेचे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Export : साखर निर्यातीचे वास्तव

Loksabha Election 2024 : पुणे, शिरूर, मावळसाठी आज होणार मतदान

Violation of Code of Conduct : आचारसंहिता भंगाच्या दीड हजार तक्रारींवर कारवाई

Summer Heat : उन्हामुळे केळी, भाजीपाल्याला फटका

Pre Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व वादळी पावसाचा दणका

SCROLL FOR NEXT