Team Agrowon
शेतीमाल बाजारात सध्या हरभरा तेजीत असल्याची चर्चा आहे. त्यातच हरभरा लागवड (Chana Sowing) गेल्यावर्षीपेक्षा कमी झाली.
त्यामुळं २०२३ मध्ये हरभऱ्याला चांगला दर (Chana Rate) मिळू शकतो, असा अंदाजही व्यक्त केला जातोय.
हरभरा बाजारात मागील दोन महिन्यांपासून गुणवत्तापूर्ण मालाची टंचाई आहे.
देशातील दिल्ली, मुंबई, कोलकाता, पुणे आदी मोठ्या बाजारपेठांमध्ये टंचाई होती.
त्यामुळं दरही वाढले. सध्या या बाजारांमध्ये हरभऱ्याला सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ३०० रुपये दर मिळतोय. तसंच हा दर टिकून राहील, असंही सांगितलं जातं.
मागील हंगामात हरभरा तोट्याचा ठरला. त्यामुळं यंदा शेतकरी हरभरा लागवड कमी करतील, असा अंदाज होता. पण अगदी मागील आठवड्यापर्यंत पेरा काहीसा जास्त दिसत होता. मात्र आज, म्हणजेच ६ जानेवारीपर्यंत हरभरा पेरणी गेल्यावर्षीपेक्षा १.२४ टक्क्यांनी घटली.