Banglore News: कर्नाटकात ऊसदरासाठी जिल्हावार ऊस आंदोलन तीव्र होत आहे. बेळगाव जिल्ह्यातील आंदोलन मिटल्यानंतर आता बागलकोट जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले आहे. मुधोळ तालुक्यातील महालिंगपूर शहराजवळील संगनट्टी क्रॉस येथे गुरुवारी (ता. १३) सायंकाळी आंदोलकांनी तब्बल ५० हून अधिक ट्रॅक्टर पेटवले. या घटनेत हजारो टन ऊस जळून खाक झाला असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. .राज्य सरकारने काढलेला प्रति टन ३३०० रुपये देण्याचा तोडगा अमान्य करत, मुधोळमध्ये शेतकऱ्यांनी उसाला प्रति टन ३५०० दर देण्याची मागणी करत आंदोलन छेडले होते. सुरुवातीला निपाणी-महालिंगपूर राज्य महामार्गावर त्यांनी वाहतूक रोखली. नंतर संतप्त शेतकऱ्यांनी सैदापूर साखर कारखान्याला घेराव घालण्याचा प्रयत्न केला..Sugarcane Price Protest: ‘स्वाभिमानी’ची शुक्रवारपासून गडहिंग्लजमध्ये पदयात्रा.या वेळी पोलिस मध्यस्थी करीत असताना आक्रोशित शेतकऱ्यांनी सैदापूर साखर कारखान्याच्या शेडजवळ उसाने भरलेले ट्रॅक्टर पेटवून दिले. घटनास्थळी सुमारे २०० हून अधिक ट्रॅक्टर उभे होते. ऊस पेटवल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. परिसरात दाट धूर आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते..Kolhapur Sugarcane Protest: एफआरपी थकित असताना ८ कारखाने कसे सुरु झाले?, कोल्हापुरात १४ संघटनांचे हातात चाबूक घेऊन आंदोलन.दरम्यान कर्नाटक सरकारने हावेरी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनापुढे झुकून साखर रिकव्हरी मोजण्यासाठी समर्पित प्रयोगशाळा स्थापन करण्यास सहमती दर्शविली आहे. साखर रिकव्हरीचे प्रमाण कमी झाल्याने आपला मोबदला कमी होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. खासगी कंपन्यांनी दोन दशकांपूर्वी सहकारी तत्त्वावर चालणारा कारखाना ताब्यात घेतल्यापासून रिकव्हरीचे प्रमाण झपाट्याने घटले, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे..रिकव्हरी सातत्याने कमीपूर्वी १० टक्क्यांपेक्षा जास्त असलेली रिकव्हरी आता हावेरी जिल्ह्याच्या सर्व युनिट्समध्ये सुमारे ९.६ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. यामुळे त्यांना इतर भागांत मिळणाऱ्या ३३०० रुपयांपेक्षा कमी मोबदला मिळत आहे. मातीची परिस्थिती, पाणीपुरवठा, हवामान आणि ऊस तोडणीच्या वेळा यात कोणताही बदल झाला नसतानाही रिकव्हरीचा दर सातत्याने कमी होत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.