बाजार विश्लेषण

Soybean Market: सोयाबीन, सूर्यफुल तेल आयातीवर सीमाशुल्क आणि सेस माफ

Team Agrowon

पुणेः देशातील बाजारात खाद्यतेलाचे भाव (Edible oil rate) मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. खाद्यतेल स्वस्त झाल्याचा परिणाम सोयाबीन (soybean) आणि मोहरीच्या (Mustard) दरावरही झाला.

त्यामुळे शेतकरी आणि उद्योगांकडूनही खाद्यतेलाच्या आयातशुल्कात (Import) वाढ करण्याची मागणी केली होती. पण सरकारने ३० जूनपर्यंत कच्चे सोयाबीन आणि सूर्यफूल तेल आयातीवरील सीमाशुल्क आणि कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर सवलत देण्याचा निर्णय घेतला.

देशातील तेलबिया बाजारावर हंगामाच्या सुरुवातीपासूनच खाद्यतेल दरातील नरमाईचा दबाव आहे. गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल दर तेजीत होते. यामुळे भारतातही खाद्यतेलाचे दर तेजीत होते. कारण भारत खाद्यतेल आयातीवर अवलंबून आहे.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील खाद्यतेल दरातील चढ उताराचा देशातील बाजारावरही लगेच परिणाम होत असतो. परिणामी गेल्यावर्षी खाद्यतेलाच्या भावात मोठी वाढ झाली होती. याचा फटका भारतालाही बसला होता.

मात्र मागील ८ महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात मोठी नरमाई आली. दरात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट झाली. खाद्यतेल स्वस्त झाल्यामुळे भारतात आयात वाढली. मागील काही महिन्यांपासून देशात खाद्यतेल आयातीचा लोंढाच आला.

याचा दबाव सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात जाणवला होता. सोयाबीनचे भाव हंगामाच्या सुरुवातीपासूनच दबावात राहीले. तर मोहरीचे भावही पडले.

सध्या मोहरीला हमीभावापेक्षा कमीच भाव मिळत आहे. तर सोयाबीनच्या दरातील तेजी कमी झाली. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

देशात स्वस्त खाद्यतेलाची आयात वाढून साठे तयार झाले. त्यामुळे खाद्यतेल आयातीवरील शुल्कात वाढ करावी, अशी मागणी शेतकरी आणि उद्योगांकडूनही केली जात होती.

पण सरकारने आयातशुल्कात वाढ करण्याऐवजी ३० जूनपर्यंत कच्चे सोयाबीन आणि सूर्यफूल तेल आयातीवरील सीमाशुल्क आणि कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर सवलत देण्याचा निर्णय घेतला. वित्त मंत्रालयाने याबाबतचा अद्यादेश नुकताच काढला.

मागील १५ दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या भावात मोठी घट झाली. सोयाबीन तेलाचे भाव सध्या निचांकी पातळीवर आहेत.

तर सूर्यफुल तेलाच्या भावातही घट झाली. त्यामुळे सरकारने सवलत दिल्यास सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाची आयात मोठ्या प्रमाणात होईल, असा अंदाज व्यापारी आणि आयातदार व्यक्त करत आहेत. 


Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT