Soybean Market
Soybean Market  Agrowon
बाजार विश्लेषण

Soybean Market : पुढील आठवड्यात सोयाबीनचे दर वाढण्याचा अंदाज

Anil Jadhao 

अनिल जाधव

पुणेः देशातील सोयाबीनचे दर (Soybean Rate) वाढण्याची शक्यता आता निर्माण झाली. कारण चालू आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात मोठे चढ उतार राहीले.

पण सोयापेंडच्या दरात (Soyacake Rate) वाढ झाली होती. तर देशातील बाजारातही दरात काहीशी सुधारणा झाली. पुढील आठवड्यातही देशातील बाजारात सोयापेंडचे दर वाढू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय बाजारात या आठवड्यात जवळपास सर्वच शेतीमालाच्या दरात तेजी मंदी पाहायला मिळाली. सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार होते.

मंगळवारी म्हणजेच ३ जानेवारीला सोयाबीनचा बाजार (Soybean Market) १५.२० डाॅलर प्रतिबुशेल्सवर खुला झाला होता. रुपयात हा दर ४ हजार ६२६ रुपये प्रतिक्विंटल होतो. त्यानंतर दरात मोठी घट झाली.

गुरुवारी सोयाबीनने आठवड्यातील निच्चांकी १४.७० डाॅलरचा टप्पा गाठला. रुपयात सांगायचं झालं तर हा ४ हजार ४७४ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर कमी झाला.

तर शुक्रवारी दरानं काहीशी उभारी घेत बाजार १४.९२ डाॅलरवर म्हणजेच ४ हजार ५३५ रुपयांवर बंद झाला. मंगळवारच्या दराशी तुलना करता शुक्रवारी सोयाबी ९१ रुपयाने कमी झाले होते.

मात्र या आठवड्यात सोयातेलाचे दर नरमले होते. खाद्यतेल बाजारातील नरमाईचा सोयातेलाच्या दरावरही परिणाम जाणवला.

मंगळवारी ६५ सेंट प्रतिपाऊंडवर असणारे सोयातेलाचे दर शुक्रवारी ६३.३६ सेंटवर होते.

सोयापेंड तेजीत

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर काहीसे नरमले, मात्र सोयापेंडच्या दरात वाढ झाली. मंगळवारी सोयापेंडचे वायदे ४६५ डाॅलर प्रतिटनावर खुले झाले होते.

रुपयात हा दर ३८ हजार २५५ रुपये होतो. त्यानंतर मात्र दरात चढ उतार आले. गुरुवारी दर ४६० डाॅलरवर घसरल्यानंतर पुन्हा वाढले.

शुक्रवारी आठवड्याचा बाजार बंद झाला तेव्हा दरानं मागील सहा महिन्यांतील उच्चांकी टप्पा गाठला. शुक्रवारी बाजार ४७७ डाॅलरवर बंद झाला.

म्हणजेच ३९ हजार २४२ रुपयांवर सोयापेंडचे वायदे बंद झाले. मागील आठवडाभरात सोयापेंडच्या दरात टनामागं जवळपास एक हजार रुपयांची सुधारणा झाली होती.

देशातील दरपातळी काहीसे वाढले

चालू आठवड्यात देशातील सोयाबीन दरातही क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांपर्यंत तेजी मंदी दिसून आली.

सोमवारी देशातील सोयाबीनची भावपातळी ५ हजार ३०० ते ५ हजार ५०० रुपये होती. त्यात काहीसे चढ उतार होत बुधवारी दर ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपयांवर पोचले होते. शनिवारीही हा दर कायम होता.

दरवाढीस पुरक स्थिती

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर एका दरपातळीवर टिकून आहेत. मात्र सोयापेंडच्या दरात तेजी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर वाढल्याचा भारतीय सोयाबीनला थेट फायदा होतो, असा आजवरचा अनुभव आहे. दर वाढल्यानंतर देशातून सोयापेंड निर्यात वाढू शकते. त्यामुळं पुढील आठवड्यात सोयाबीन दरात आणखी १०० रुपयांची सुधारणा दिसू शकते, अशा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

Commodity Market : हळद, मुगाचे भाव वधारले

SCROLL FOR NEXT