Sunetra Pawar Takes Oath As Deputy CM Of Maharashtra: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यामुळे सुनेत्रा पवार ह्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. लोकभवन येथे झालेल्या या शपथविधीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि आमदार उपस्थित होते. यावेळी 'अजितदादा पवार अमर रहे', 'सुनेत्रा पवार तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!' अशा घोषणा अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. .अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले. या पदावर आज सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. आज दुपारी झालेल्या राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर लगेच सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडला. .दादांच्या अकाली जाण्यानं मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला...; सुनेत्रा पवारांची पोस्टउपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत असल्याची भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. "आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे. दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन. या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन." असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. .शपथविधीसाठी इतकी घाई का केली?, भुजबळ म्हणाले...शपथविधीसाठी इतकी घाई का केली? असा सवाल उपस्थित केला जात असल्याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. ''आज चौथा दिवस आहे ठीक आहे, तुम्ही सांगा, किती दिवसांनी शपथविधी करायचा होता?'' असा उलट सवाल भुजबळ यांनी पत्रकारांना केला. राज्याला महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत. अजितदादांचा अपघात डोळ्यासमोर जात नाही. पण वहिनींनी हे दुःख पचवून पक्षाच्या कामासाठी पुन्हा उभे राहण्याचे ठरवले आहे. ही मोठी गोष्ट आहे, असे ते पुढे म्हणाले. .Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा राजीनामा.पंतप्रधान मोदी यांच्याकडून शुभेच्छापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ''महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पूर्ण करतील.'' असे पंतप्रधान मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. .Ajit Pawar Passes Away: ग्रामीण महाराष्ट्राचा दोर तुटला .अतिशय कठीण परिस्थितीत....अतिशय दुःखद स्थितीमध्ये सुनेत्रा वहिनींना शपथ घेण्याची वेळ आज नियतीने आणली. आम्ही सर्व दुःखी आहोत. जनतेची, आमदारांची तीच भावना होती की वहिनींच्याकडे जबाबदारी सोपवावी. अतिशय कठीण परिस्थितीत त्यांनी सर्वांची विनंती मान्य केली, अशी भावना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.