Soybean Market: सोयाबीनचे दर का कमी झाले?

Anil Jadhao 

खाद्यतेलाचे दर कमी झाल्याचा परिणाम सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारावर झाला. १६ नोव्हेंबरला सोयाबीनचे वायदे १४.५६ डाॅलर प्रतिटनाने झाले होते. मात्र ते आज १४.२० डाॅलर प्रतिटनांपर्यंत घसरले.

पामतेलाचे दर नोव्हेंबरच्या सुरुवातीला ४ हजार ३२२ रिंगीट प्रतिटनावर पोचले होते. रिंगीट हे मलेशियाचे चलन आहे. ते आता ३ हजार ८२८ रिंगीटवर आले आहेत. 

पामतेलाचे दर कमी झाल्याचा परिणाम सोयातेलवरही झाला. सोयातेलाचे दर मागील पाच दिवसांमध्ये सोयातेलाचे दर ७७ सेंट प्रतिपाऊंडवरून ७०.३२ सेंटपर्यंत कमी झाले.

आंतरराष्ट्रीय बाजारातील सर्व घडामोडींचा परिणाम देशातील सोयाबीन दरावरही जाणवला. मागील पाच दिवसांपासून सोयाबीनचे दर कमी जास्त होत आहेत.

१६ नोव्हेंबरच्या तुलनेत आज बहुतेक बाजार समित्यांमधील दर क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांनी नरमले होते. आज देशातील बहुतेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

सध्या सोयाबीनचे दर नरमले असले तरी दरात जास्त घट होणार नाही. सोयाबीनला यंदाच्या हंगामात सरासरी किमान ५ हजार ते कमाल ६ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केले आहे.

cta image
येथे क्लिक करा