Pomegranate  Agrowon
बाजार विश्लेषण

Pomegranate Market Rate : डाळिंब दरात प्रतिकिलो २५ ते ३५ रुपयांनी सुधारणा

Pomegranate Price Hike : गेल्यावर्षीच्या तुलनेत हंगामाच्या प्रारंभी डाळिंबाच्या दरात प्रतिकिलो २५ ते ३५ रुपयांनी सुधारणा झाली असल्याने डाळिंब उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Abhijeet Dake

Sangli News : देशातील यंदाचा मृग बहरातील डाळिंबाचा हंगाम सुरू झाला आहे. पाऊस कमी असल्याने डाळिंबाच्या वजनावर परिणाम झाला असला तरी, गेल्यावर्षीच्या तुलनेत हंगामाच्या प्रारंभी डाळिंबाच्या दरात प्रतिकिलो २५ ते ३५ रुपयांनी सुधारणा झाली असल्याने डाळिंब उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

देशात यंदाच्या हंगामात ४० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर मृग बहर साधला आहे. डाळिंबाची काढणी सुरू झाली असून आतापर्यंत ५ ते १० टक्के काढणी पूर्ण झाली आहे. यंदाच्या हंगामाच्या प्रारंभी चांगल्या दर्जाच्या डाळिंबाला प्रतिकिलो १५५ ते १६५ रुपये दर मिळत आहे.

सध्या बाजारात डाळिंबाची आवक कमी असून उठावही चांगला आहे. त्यामुळे डाळिंबाला चांगले दर मिळत आहेत. गत हंगामात सुरुवातीला डाळिंबाला १२५ ते १३० रुपये प्रतिकिलो दर होता. यंदाच्या हंगामात दरा २५ ते ३५ रुपयांपर्यंत सुधारणा झाली असल्याने डाळिंब दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे.

आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडू या राज्यातील डाळिंबाचा पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये संपेल. दुसरा टप्पा डिसेंबर-जानेवारीपासून सुरू होईल. अर्थात, नोव्हेंबरच्या मध्यापासून बाजारात डाळिंबाची आवक वाढण्यात सुरुवात होईल.

यंदा मृग बहरातील क्षेत्रात घट झाल्याने बाजारात मागणी आणि उठावही होण्याची शक्यता असल्याने दरात वाढ होण्याचीही शक्यता डाळिंब संघाने व्यक्त केली आहे.

गुजरातमध्ये कुजव्याचा प्रादुर्भाव

देशातील डाळिंब उत्पादन घेणाऱ्या राज्यात डाळिंब चांगले बहरले आहे. गुजरातमध्ये डाळिंब, लिंबू किंवा पेरूच्या आकाराचे असताना पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फटका डाळिंबाला बसला. सध्या डाळिंबात कुजवा रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.

युरोपला निर्यात जानेवारीपासून

देशातून डाळिंबाची निर्यात होत असून महाराष्ट्रातून सर्वांत जास्त युरोपला डाळिंबाची निर्यात होते. गेल्या दोन वर्षांपासून देशांतर्गत बाजारपेठेत चांगले दर मिळाल्याने डाळिंबाची युरोपला निर्यात झाली नाही.

यंदाच्या हंगामात जानेवारीपासून डाळिंबाची युरोपला निर्यात सुरू होईल. त्याचबरोबर आखाती देश आणि बांगलादेशलाही डाळिंबाची मोठ्या प्रमाणात निर्यात यंदाच्या हंगामात होईल.

वजनात घट

मुळात, हंगाम धरल्यापासून पावसाने दडी मारली. त्यातच वाढत्या उष्णतेचा परिणाम डाळिंब बागेवर झाला. शेतकऱ्यांनी शाश्वत पाण्याच्या उपलब्धतेनुसार बागा साधल्या आहेत. वास्तविक, दरवर्षी एका डाळिंबाचे वजन २०० पासून ५०० ग्रॅमपर्यंत मिळते.

परंतु पाऊस कमी असल्याने डाळिंबाचा आकार आणि वजनात घट होऊन यंदाच्या हंगामात एका डाळिंबाचे वजन १५० ते ३५० ग्रॅम मिळत आहे.

यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून चांगल्या दर्जाच्या डाळिंबाला चांगले दर मिळत आहेत. यंदा देशांतर्गत बाजारपेठेत दर चांगले मिळत असल्याने युरोपला डाळिंबाची निर्यात किती होईल, हे सांगता येणार नाही.
प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ
यंदा पुरेसा पाऊस नाही. शाश्वत पाण्यावर डाळिंबाच्या बागा साधल्या आहेत. पण डाळिंबाचे वजन कमी झाले आहे.
- विजय मरगळे, डाळिंब उत्पादक शेतकरी, तडवळे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT