Sugar Mill Agrowon
बाजार विश्लेषण

पुणे जिल्ह्यातील पंधरा साखर कारखाने बंद

भोरमधील राजगड सहकारी साखर कारखाना सुरूच

टीम ॲग्रोवन

पुणे : ऊस गाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) उरकण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांपैकी (Sugar Mills) १५ कारखाने बंद झाले आहेत. सध्या भोरमधील राजगड सहकारी साखर (Rajgad Sugar Mill) कारखाना सुरू आहे. उर्वरित कारखान्यांनी गळीत हंगामाची (Crushing Season) सांगता उरकून घेतली आहे. यामुळे ऊसतोड मजूर परतीच्या प्रवासासाठी निघाले आहेत. काही मजूर गावाकडे परतल्याने खरिपाची तयारी सुरू केली आहे.

हंगामात १७ साखर कारखान्यांपैकी १६ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला होता. साखर कारखाने सुरू होऊन साधारपणे सात महिने झाले आहेत. परंतु, अजूनही एका कारखान्याचे गाळप सुरूच आहे. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत कारखान्याचा गाळप हंगाम संपत असतो. पण गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली होती. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरवर्षी प्रमाणे ऊसतोड मजूर आपले घर सोडून ऊसतोडीसाठी कारखाना कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे कारखाना कार्यस्थळावर चांगलीच लगबग असते. किराणा दुकाने, हॉटेल यांचाही व्यवसाय ऊस हंगामात तेजीत असतो. मात्र, कामगार गावाकडे परतू लागले आहेत. त्यामुळे कारखाना परिसर ओस पडू लागल्याची स्थिती आहे.

यंदा जिल्ह्यात एकूण सहकारी १० व खासगी ६ साखर कारखाने सुरू झाले होते. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ८६ हजार २५० मेट्रीक टन एवढी होती. यंदा उसाची वाढलेली उपलब्धता लक्षात घेता गळीत हंगाम उशिराने म्हणजेच ६ एप्रिलपासून बंद होण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाईची झळ बसली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी गळीत हंगाम संपवण्याचा धडाका सुरू केला होता.

बंद झालेले साखर कारखाने :

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, माळेगाव, छत्रपती, विघ्नहर, कर्मयोगी, श्री संत तुकाराम, घोडगंगा, भीमाशंकर, नीरा भीमा, श्रीनाथ म्हस्कोबा, बारामती अॅग्रो, दौंड शुगर, व्यंकटेश शुगर, पराग अॅग्रो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT