Nashik News: गेल्या काही वर्षात ‘पिवळं सोनं’ म्हणून शेतकऱ्यांची मक्याला पसंती होती. स्थिर दरामुळे यंदा पेरणी वाढली. परिणामी उत्पादनात मोठी वाढ होऊन आवक वाढल्याने मक्याचे दर गडगडले आहेत. किमान आधारभूत किमतीपेक्षा (एमएसपी) क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपये कमी दर मिळत असल्याची स्थिती आहे..केंद्राने खरीप हंगामासाठी मक्याला २,४०० रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत जाहीर केली. मागील वर्षी दर स्थिर राहिल्याने २०२५-२६ खरीप हंगामात राज्यभरात मक्याची लागवड वाढून १४ लाख ५२ हजार ४८२ हेक्टर क्षेत्रावर झाली. मागील वर्षीच्या तुलनेत ३ लाख ३० हजार हेक्टरने क्षेत्र वाढले..यंदा पेरणी दोन ते तीन टप्प्यांत झाली. मात्र अतिवृष्टीमुळे राज्यभरात मक्याची काढणी एकदाच होऊन दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणावर आवक बाजारात होत आहे. त्यातच इतर प्रमुख पिकांचे नुकसान झाल्याने पुढील रब्बी हंगामासाठी भांडवलाची गरज असल्याने शेतकरी मका विकण्यासाठी आणत आहेत. आवक कायम असल्याने दरावर मोठा परिणाम होत आहे..Maize Procurement: मका खरेदीसाठी केंद्रांवर नोंदणी सुरू.राज्यात बाजार समित्यांमध्ये किमान ९०० रुपयांपासून ते सरासरी १७०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. त्यातच कुक्कुटखाद्य उत्पादक, स्टॉकिस्ट यांसह प्रक्रिया उद्योगांकडून सध्या खरेदी मंदावली आहे. जो मका वाळलेला असून प्रतवारीत दर्जेदार आहे. त्यालाही बाजारात किमान आधारभूत किंमत मिळत नसल्याचे चित्र आहे..मक्याला मिळतोय १० वर्षांपूर्वीचा दरमागील दोन वर्षांचा दराचा आढावा घेतल्यास मक्याला २,१०० ते २,४०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळत होते. मात्र यंदा किमान आधारभूत किमतीची कुठलीही शाश्वती शेतकऱ्यांना मिळत नसल्याची स्थिती आहे. यंदा मिळणारे प्रति क्विंटल सरासरी १५०० ते १६०० रुपये इतके दर दहा वर्षांपूर्वीचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच यंदा अतिवृष्टीने मक्याचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर सोलापूर व नाशिक जिल्ह्यांत मका उत्पादकांना मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी एकरी उत्पादनात ४० ते ५० टक्के घट आहे. त्यातच १६०० ते १७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात आहे. त्यातच सरकारची हमीभाव खरेदी केंद्रे अद्याप सुरू नसल्याने हाही फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे..Maize Rate: मक्याचे दर पडलेलेच !.राज्यातील बाजार समित्यांमधील दरस्थिती (ता. २४ नोव्हेंबर)बाजार समिती...आवक...किमान...कमाल...सरासरीलासलगाव...१०२००...९००...१,७५२...१६३०विंचूर लासलगाव...७२००...१३००...२३९९...१५७५अमळनेर...८०००...१६००...१७५०...१६५०येवला...११०५०...१२५०...१७२१...१५००अंदरसूल(येवला)...११९९८...९००...१८००....१५५१अमळनेर...८०००...१०००...१६७५...१६७५नंदुरबार...५३३६...१०००...१५७१...१२७३.जालना...५२८३...१०००...१७४०...१५२५मालेगाव...६५५०...९००...१६६२...१४९०चाळीसगाव...६०००...११५०...१७४०...१३५०मनमाड...५७२२...१२५१...१७००...१५६०मलकापूर...५५६०...१२००...१५९०...१३८०कळवण...५२००...९११...१८०१...१४५१देवळा..५१२५...१००५...१६७५...१४५०चांदवड...३९८०...११००...१७९९...१४५०चांदूर बाजार...२०६१...११५०...१६५०...१५००.बाजारामध्ये मक्याला मिळणारा भाव हा साधारण ११०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल इतका आहे. हा दर हमीभावापेक्षा कमी आहे. मक्याच्या उत्पादन खर्चाचा विचार करता तसेच या वर्षी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा विचार करता हे दर शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाही. शासनाने किमान हमीभावाचा फरक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करणे आवश्यक आहे.सचिन होळकर, कृषी अभ्यासक, लासलगाव.सरकारने किमान आधारभूत किंमत जाहीर केली असली तरी ती प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा. सरकारने खरेदी केंद्रे वाढवावीत व थेट शेतकऱ्यांकडून मका खरेदीची व्यवस्था अधिक प्रभावी करावी, जेणेकरून दलालांवर अवलंबित्व कमी होईल.बापू डावरे, शेतकरी, कोनांबे, ता. सिन्नर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.