Soybean Market  Agrowon
बाजार विश्लेषण

Soybean Market : सोयाबीन बाजाराकडून शेतकऱ्यांची निराशा?

देशातील सोयाबीन बाजारानं शेतकऱ्यांची निराशाच केली. देशातील बाजारात सोयाबीन दरात १०० रुपयांची नरमाई पाहायला मिळाली. मात्र पुढील काही दिवसांमध्ये सोयाबीन दर सुधारण्याचा अंदाज आहे, असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.

Anil Jadhao 


अनिल जाधव
पुणेः मागील आठवडाभर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात (Sobean Rate) मोठे चढ उतार पाहायला मिळाले.

सोयाबीननं मागील सात महिन्यांतील उच्चांकी दर चालू आठवड्यात गाठला होता. सोयापेंडचेही (Soyacake) दर विक्रमी पातळीवर पोचले.

मात्र देशातील सोयाबीन बाजारानं (Soybean Market) शेतकऱ्यांची निराशाच केली. देशातील बाजारात सोयाबीन दरात १०० रुपयांची नरमाई पाहायला मिळाली.

मात्र पुढील काही दिवसांमध्ये सोयाबीन दर सुधारण्याचा अंदाज आहे, असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात मोठे चढ उतार पाहायला मिळाले. या आठवड्यात सोमवारी सोयाबीनचे वायदे बंद होते.

मंगळवारी १५.१७ डाॅलरवर बाजार सुरु झाला. रुपयात हा दर ४ हजार ५१८ रुपये क्विंटल होतो. बुधवारीही दरातील वाढ कायम होती.

बुधवारी सोयाबीन दरानं मागील सात महिन्यांतील उच्चांकी दराचा टप्पा गाठत १५.४७ डाॅलरपर्यंत मजल मारली.

म्हणजेच ४ हजार ६१४ रुपयांवर सोयाबीन पोचलं होतं. मात्र बुधवारीच  बाजारात घसरण होऊन १५.१७ डाॅलरवर बंद झाला. 

गुरुवारीही दर याच दरम्यान कायम होते. पण शुक्रवारी सोयाबीन दरात पुन्हा घट होऊन १५.०९ डाॅलरपर्यंत घसरले.

रुपयात सांगायचं झालं तर हा दर ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल होतो. म्हणजेच या आठवड्यात सोयाबीन दरात चढ उतार राहीले. मात्र शेवटी दरपातळी न वाढता कमीच झाली.

सोयापेंडच्या दरातही तेजी मंदी पाहायला मिळाली. मंगळवारी सोयापेंडचे भाव ४७१ डाॅलर प्रतिटनांवर सुरु झाले.

तर बुधवारी सोयापेंडने ४८५ डाॅलरचा टप्पा गाठला होता. पण त्यानंतर सोयापेंडचे दर कमी झाले. शुक्रवारी सोयापेंडचे वायदे ४६४ डाॅलर प्रतिटनांवर बंद झाले होते.

म्हणजेच सोयाबीनसोबतच सोयापेंडचे दरही या आठवड्यात कमी झाले. पण सोयाबीन आणि सोयापेंडची दरपातळी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात काहीशी अधिक राहीली.

देशातील दरपातळी
देशातील शेतकऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून दरवाढीची प्रतिक्षा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात  सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात मोठी वाढ झाली होती.

मात्र देशातील दरपातळी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान कायम होती. पण शुक्रवारी बाजारात क्विंटलमागं १०० रुपयांची नरमाई दिसून आली.

शनिवाराही बाजार समित्यांमधील हा दर कायम होता. शनिवारी देशातील बाजारात ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलवर बंद झाला.

दरवाढीचा अंदाज

चीनकडून सोयाबीनला मागाणी वाढत आहे. तर अर्जेंटीनात दुष्काळी स्थिती आहे. अर्जेंटीनातील  सोयाबीन उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात घटणार आहे.

यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर वाढले आहेत. मात्र देशातील बाजार स्थिर आहे.

पण चीनचं नववर्ष संपून बाजार सुरु झाल्यानंतर म्हणजेच जानेवारीच्या शेवटी देशातील बाजारातही सुधारणा दिसू शकते.

त्यामुळं शेतकऱ्यांनी ५ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी दरात सोयाबीन विकू नये. सोयाबीनला सरासरी ५ हजार ५०० ते ६ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT