Wheat  Agrowon
बाजार विश्लेषण

मध्य प्रदेशमधील गव्हाला मागणी वाढली

सध्या रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात अन्नधान्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक देशांत अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

टीम ॲग्रोवन 

इंदोर ः सध्या रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात अन्नधान्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक देशांत अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. रशिया आणि युक्रेन हे जगाला गव्हाचा पुरवठा (Wheat Supply) करणारे प्रमुख पुरवठादार देश असल्याने सध्या जागतिक स्तरावर अन्नधान्याचा साठा (Grain Stock) कमी पडू लागला आहे. अशा परिस्थितीत भारताने अनेक देशांना गव्हाचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे. अशात मध्य प्रदेशात पिकणाऱ्या गव्हाच्या शरबती (Sharabati Wheat) आणि काठिया (kathiya Wheat) या जातीच्या गव्हाला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दिली.

मध्य प्रदेश स्टेट ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक विकास नरवाल (Vikas Narwal) यांनी सांगितले की, खुल्या बाजारात गव्हाच्या किमतीत (Wheat Rate) झालेल्या वाढीमुळे सरकारकडून होणाऱ्या गहू खरेदीमध्ये ३० टक्के घट झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर गव्हाच्या निर्यातीत वाढ झाली असून बाजारांमध्ये गव्हाची आवक वाढताना दिसत आहे. मागील हंगामात मध्य प्रदेशातून १.७६ लाख टन गव्हाची निर्यात करण्यात आली होती. तर मागील केवळ एका महिन्यात सुमारे २.५ लाख टन गहू निर्यात करण्यात आला असून यंदाचा हंगाम संपण्यासाठी अद्याप दोन महिने शिल्लक आहेत, असे नरवाल यांनी सांगितले.

व्यापारी स्थानिक शेतकऱ्यांकडून शरबती आणि काठिया या जातीचा गहू प्रामुख्याने खरेदी करत असून तो बांगलादेश, व्हिएटनाम, फिलिपाइन्स तसेच संयुक्त अरब अमिराती या देशांत निर्यात करतात. आता त्यामध्ये आता अफ्रिकेचीही भर पडली आहे. अफ्रिकेतून मध्य प्रदेशातील गव्हाला वाढती मागणी पाहता येत्या काही दिवसांत मध्य प्रदेशातील गहू इजिप्त, झिंबाब्वे, मोझांबिक आणि टांझानिया येथे निर्यात होऊ शकेल.

२०२१-२२ च्या रब्बी हंगामात राज्यात ९५.५१ लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड करण्यात आली होती. त्यापासून यंदा ३४६.७० लाख टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साधारण मान्सून संपल्यानंतर नोव्हेंबरच्या मध्यात गव्हाची लागवड करण्यात येते. त्यानंतर साधारण एप्रिल आणि मेमध्ये गव्हाची कापणी करण्यात येते, असे नरवाल यांनी सांगितले. सध्या राज्यात उत्तम दर्जाच्या गव्हाला २०१५ रुपयांचा किमान आधारभूत दर दर देण्यात येत असल्याचे नरवाल यांनी सांगितले.

क्विंटलला २२०० ते २५०० रुपये भाव

उत्तम दर्जाच्या गव्हासाठी व्यापारी सध्या शेतकऱ्यांची दारे ठोठावत असून शरबती गहू खरेदी करून तातडीने त्याचा मोबदला देण्याची तयाहीही व्यापारी दाखवत आहेत. सध्या व्यापऱ्यांकडून क्विंटलला २२०० ते २५०० रुपये भाव देण्यात येत आहे, अशी माहिती धार जिल्ह्यातील लोहारी बुजगर येथील शेतकरी बनेसिंह चौहान यांनी सांगितले. यापूर्वी आपण व्यापाऱ्यांमध्ये कधीही गहू खरेदीसाठी अशी स्पर्धा पाहिली नव्हती असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Harvesting : भात पीक काढणीची लगबग

CM Eknath Shinde : महायुतीच्या योजना चोरून बनवला वचननामा : मुख्यमंत्री शिंदे

Agriculture Subsidy : दोन लाख अठरा हजार शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

PM Narendra Modi : शेतकरी सशक्त होऊन देशाच्या प्रगतीचा नायक बनावा : मोदी

Broiler Lifting Rates : ब्रॉयलर पक्ष्याच्या लिफ्टिंग दरात वाढ

SCROLL FOR NEXT