Maize Turmeric  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

डॉ.अरूण कुलकर्णी

फ्यूचर्स किमती ः सप्ताह २० ते २६ एप्रिल २०२४

हरभऱ्याची आवक १ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत उच्चांकी असते. गेल्या वर्षी (२०२३) आवक आधीच्या वर्षापेक्षा १७ टक्क्यांनी कमी होती. या वर्षीसुद्धा ती गेल्या वर्षीच्या तुलनेने ८ टक्क्यांनी कमी झाली आहे. हरभरा उत्पादनात महत्त्वाच्या असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशमधील आवक या वर्षी लक्षणीय कमी झाली; फक्त गुजरात व राजस्थान येथील आवक वाढली.

या सर्वांचा परिणाम हरभऱ्याच्या भावावर झाला आहे. गेल्या दहा महिन्यांत हरभऱ्याचे भाव रु. रु. ५,५०० व रु. ६,२०० या दरम्यान राहिले आहेत. या सप्ताहात ते रु. ६,१५० वर आले आहेत. या सप्ताहात मक्याचे भाव कमी झाले. हळदीने परत उसळी घेतली. या सप्ताहात हळदीच्या जून फ्यूचर्समध्ये २.४ टक्क्यांनी वाढ झाली.

१९ एप्रिल २०२४ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत ः

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात २.९ टक्क्यांनी घसरून रु. ५७,९२० वर आले होते. या सप्ताहात ते ०.६ टक्क्याने वाढून रु. ५८,२४० वर आले आहेत. मे फ्यूचर्स भाव ०.७ टक्क्याने वाढून रु. ५८,३४० वर आले आहेत. जुलै फ्यूचर्स भाव रु. ६०,५२० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.९ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाची आवक कमी होत आहे.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) सुद्धा या सप्ताहात ०.६ टक्क्याने वाढून रु. १,४५८ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,४४० वर आले आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) या सप्ताहात ५.१ टक्क्यांनी घसरून रु. २,०८० वर आले आहेत. फ्यूचर्स (मे) किमती १.१ टक्क्याने घसरून रु. २,०८९ वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स किमती रु. २,११४ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.६ टक्क्याने अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे. मक्याची आवक कमी होत आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १७,२४२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा २.६ टक्क्यानी वाढून रु. १७,६८७ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती २.४ टक्क्यांनी वाढून रु. १९,०३० वर आल्या आहेत. ऑगस्ट किमती रु. १९,५४२ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १०.५ टक्क्यांनी जास्त आहेत. ट्रेडिंग करून या भाव-वाढीचा फायदा करून घेता येईल.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात १.३ टक्क्याने वाढून रु. ६,०७५ वर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या १.२ टक्क्याने वाढून रु. ६,१५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,९०० वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.५ टक्क्याने घसरून रु. ४,७२२ वर आली आहे. चालू वर्षासाठी हमीभाव रु. ४,६०० आहे. आवक कमी होत आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,५३५ वर आली होती. या सप्ताहात ती ०.६ टक्क्याने वाढून रु. १०,६०० वर आली आहे. तुरीचा नवीन वर्षासाठी हमीभाव रु. ७,००० जाहीर झाला आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे; मागणीमुळे नोव्हेंबरपासून भाव वाढत आहेत.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,४०० होती; या सप्ताहात ती रु. १,३५१ वर आली आहे. गेल्या तीन महिन्यांत कांद्याची आवक स्थिर आहे; किमती मात्र ८ मार्चपासून घसरत आहेत.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ७५० वर आली होती. या सप्ताहात ती रु. ९१७ वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT