Krushi Samruddhi Scheme : कृषी समृद्धी योजनेंतर्गत ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र आणि बीबीएफ यंत्रासाठी मिळणार अनुदान; शासन निर्णय जारी
Maharashtra Launches Subsidy : कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मितीसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कृषी समृद्धी योजनेतून ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा यंत्र, वैयक्तिक शेततळे, शेतकरी सुविधा केंद्र उभारणी, मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या चार घटकांचा समावेश आहे. या घटकांसाठी राज्य सरकारने पुढील ३ वर्षासाठी ५ हजार ६६८ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे.