Turmeric Seed : पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी थांबवली हळद बियाणे खरेदी

Water Shortage : गतवर्षी कमी झालेला पाऊस यामुळे भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने पाणी अपुरे पडू लागले आहे.
Turmeric Seed
Turmeric SeedAgrowon

Sangli News : गतवर्षी कमी झालेला पाऊस यामुळे भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने पाणी अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे हळद लागवडीनंतर पाणी कसे उपलब्ध करायचे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

परिणामी, पाणीटंचाईमुळे शेतकरी हळद लागवडीचे धाडस करत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून हळद लागवडीसाठी बियाण्यांची मागणी घटली आहे.

सांगली बाजार समितीत दरवर्षी १५०० ते १८०० टन हळदीचे बियाणे विक्रीस येते. एप्रिलपासून शेतकरी हळद बियाणे खरेदी करण्याचे नियोजन करतो. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बाजार समितीतून १५० टन बियाण्यांची खरेदी शेतकऱ्यांनी केली.

Turmeric Seed
Turmeric Production : हळद उत्पादनात ३० लाख पोती घट

सांगली जिल्ह्यासह सातारा, कर्नाटकातील शेतकऱ्यांनी हळद लागवडीचे नियोजन केले आहे. बाजारात येऊन बियाण्यांच्या दराची चौकशी करत आहेत. ज्या ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी शेतकरी लागवडीचे नियोजन करत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Turmeric Seed
Turmeric Rate : हळदीच्या दरात नरमाई

बाजार समितीत दरवर्षी १५०० ते १८०० टन बियाणे विक्रीस येते. परंतु गतवर्षी पाऊस झाला नसल्याने बियाण्याचे उत्पादनही कमी झाले आहे. त्यामुळे या वर्षीच्या हंगामात सुमारे ५०० ते ७०० टन बियाणे विक्रीस येईल, असा अंदाज बियाणे व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात १५०, तर शेवटच्या आठवड्यात ५० टन अशी एकूण २०० टन बियाणे विक्री झाली आहे. हळद बियाण्याला उठाव नसला तरी दर टिकून आहेत. दर ६५०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल आहे.

कसबेडिग्रजला बियाणे उपलब्ध

कसबेडिग्रज येथील हळद संशोधन केंद्रात ‘फुले स्वरुपा’ व ‘सेलम’ या दोन वाणांच्या हळदीचे बियाणे ६०० क्विंटल विक्रीसाठी उपलब्ध आहे. या केंद्रात बियाणे मातृकंद ३५०० रुपये क्विंटल, तर हळकुंड ३००० रुपये क्विंटल या शासकीय दरात विक्री केली जाते. ६०० क्विंटलपैकी ३०० क्विंटल बियाण्याची विक्री झाली आहे. तर उर्वरित ३०० क्विंटल बियाण्याची विक्रीही येत्या पंधरा दिवसांत होईल.

शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात हळदीचे बियाणे खरेदी केले. परंतु आता पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. त्यामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी थांबविली आहे. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत असून पाऊस झाल्यानंतर खरेदी वाढेल.
- कलंदर मकानदार, हळद बियाणे व्यापारी, सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com