Maize Market
Maize Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Rate : मक्याची आवक वाढूनही किमतीत वाढ

डॉ.अरूण कुलकर्णी

डॉ. अरुण कुलकर्णी

खरीप पिकांची आवक (Kharif Crop Arrival) सुरू होऊन आता जवळ जवळ दीड महिना झाला. १ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान, गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेने, देशातील बाजार समितींमध्ये सोयाबीनची (soybean) आवक ३८ टक्क्यांनी वाढली. मका (७ टक्के), कांदा (२४ टक्के) व टोमॅटो (११ टक्के) यांचीही आवक वाढली.

मक्याची मागणी वाढती आहे; त्यामुळे आवकेत वाढ झाली तरी किमतीसुद्धा वाढत आहेत. सोयाबीनच्या किमती गेल्या तीन सप्ताहांत वाढत होत्या; या सप्ताहात मात्र त्या घसरल्या. तरीही एकूण खाद्यतेलाची मागणी वाढत असल्यामुळे त्या फार घसरणार नाहीत.

या सप्ताहातील प्रमुख शेतीमालाच्या किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) ऑक्टोबर महिन्यात घसरत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ४ टक्क्यांनी वाढून रु. ३२,६३० वर आले होते; या सप्ताहात ते १.४ टक्क्यानं वाढून रु. ३३,१०० वर आले आहेत. डिसेंबर डिलिव्हरी भाव १.४ टक्क्याने घसरून रु. ३१,३८० वर आले आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) ०.२ टक्क्याने घसरून रु १,७९७ वर आले आहेत. कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत.

मका

मक्याच्या स्पॉट (छिंदवाडा) किमती ऑक्टोबर महिन्यात घसरत होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती १.६ टक्क्याने वाढून रु. २,१७१ वर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या १.३ टक्क्याने वाढून रु. २,२०० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (डिसेंबर डिलिव्हरी) किमती रु. २,२८५ वर आल्या आहेत. फेब्रुवारी फ्यूचर्स किमतीसुद्धा रु. २२८५ वर आहेत.

मक्याचा हमीभाव रु. १९६२ आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत. या वर्षी खरीप मक्याचे देशातील उत्पादन विक्रमी (२३.१ दशलक्ष टन) राहील असा केंद्र शासनाचा अंदाज आहे. गेल्या वर्षी उत्पादन २२.६३ दशलक्ष टन होते. मागणीसुद्धा, विशेषतः पशुखाद्यासाठी, वाढती राहील.

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती ऑक्टोबर महिन्यात घसरत होत्या. गेल्या सप्ताहात त्या १.३ टक्क्याने वाढून रु. ७,४०४ वर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या १.५ टक्क्याने वाढून रु. ७५१५ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. ७,५३० वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. ८,२३६ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती गेल्या सप्ताहात ०.३ टक्क्याने घसरून रु. ४,६४३ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.७ टक्क्याने वाढून रु. ४,७२२ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे.

मूग

मुगाच्या किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात रु. ७,१०० वर आली आहे. मुगाचा हमी भाव रु. ७,७५५ आहे. सध्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत.

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) ३.४ टक्क्यांनी वाढून रु. ५,७४४ वर आली होती; या सप्ताहात ती २ टक्क्यांनी घसरून रु. ५,६२७ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात ७.१ टक्क्यांनी घसरून रु. ७,०७५ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.

कांदा

कांद्याच्या किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या; आता त्या घसरू लागल्या आहेत. कांद्याची स्पॉट किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. २,२२५ होती; या सप्ताहात ती रु. १,८०० वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,००० होती. या सप्ताहात ती रु. ४०० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT