Maize and Milk Powder Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize, Milk Powder Import : मका, दूधपावडर, सूर्यफूल आणि मोहरी तेलाची कमी शुल्कावर आयात होणार; शेतकऱ्यांना बसणार फटका

Market Update : शेतकरी हिताच्या हिताच्या गप्पा मारणाऱ्या सरकारने आयात शुल्क कमी करून किंवा शुन्य करून मका, कच्चे सूर्यफूल तेल, रिफाईंड मोहरी तेल आणि दूध पावडरच्या आयातीला परवानगी दिली.

Anil Jadhao 

Pune News : शेतकरी हिताच्या हिताच्या गप्पा मारणाऱ्या सरकारने आयात शुल्क कमी करून किंवा शुन्य करून मका, कच्चे सूर्यफूल तेल, रिफाईंड मोहरी तेल आणि दूध पावडरच्या आयातीला परवानगी दिली. याचा थेट परिणाम देशातील दूध दर, सोयाबीन आणि मक्याच्या भावावर होण्याची शक्यता आहे. 


केंद्र सरकारने बुधवारी अधिसूचना काढून मका, कच्चे सूर्यफूल तेल, रिफाईंड मोहरी तेल आणि दूध पावडरची टॅरिफ रेट कोट्यातून आयात शुल्क कमी करून किंवा शुन्य करून आयातीला परवानगी दिली. केंद्राने १ लाख ५० हजार टन कच्चे सूर्यफुल तेल, १ लाख ५० हजार टन रिफाईंड मोहरी तेल, ४ लाख ९८ हजार ९०० टन मका आणि १० हजार टन दूध पावडर आयातीला परवानगी दिली. याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. 

सरकारने ही आयात सरकारी संस्था किंवा सरकारच्या कंपन्यांच्या माध्यमातून होईल, असे म्हटले आहे. त्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एनडीडीबी), राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशन (एनसीडीएफ) आणि नाफेडची निवड सरकारने केली आहे. देशातील वाढती महागाई कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारने अधिसूचनेत म्हटले आहे. 

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा दूध उत्पादकांना बसणार आहे. आधीच दुधाचे भाव कमी असल्याने राज्यभरात शेतकरी आंदोलने होत आहेत. दूध पावडर विशेष करून गाईच्या दुधापासून तयार होते. गाईच्या दुधाचा लिटरचा खर्च शेतकऱ्यांना ३२ ते ३३ रुपये येतो आणि सध्या दुधाला भाव २५ ते २७ रुपयांच्या दरम्यान मिळत आहे. दूध दरासाठी शेतकरी रस्त्यावर उतरत असताना दुसरीकडे सरकारने दूध पावडर आयातीचा निर्णय घेतला. याचा थेट फटका दूध दराला बसू शकतो. 

केंद्र सरकारने महागाई कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. पण खाद्यतेल, मका, दूध पावडरचे भाव पाहीले तर महागाई दिसत नाही. खाद्यतेलाचे भाव आधीच पडलेले आहेत. मक्याचे भाव हमीभावाच्या दरम्यान आहेत. तर देशात दूध पावडरचे भाव कमीच आहेत. यामुळे सरकारने हा निर्णय का घेतला? असा प्रश्न सर्वच स्तरातून उपस्थित होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : सोयाबीन खरेदीची मुदत निम्मी संपली मात्र २ टक्केही खरेदी नाही; आतापर्यंत केवळ २४ हजार टनांची खरेदी पूर्ण

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी नरमाई ; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आले दर ?

Farmer Producer Company : नवअनंत शेतकरी कंपनीची वाटचाल आशादायी

Maharashtra Election 2024 : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला तारणार?

Hawaman Andaj : थंडीमुळे राज्याला हुडहुडी; राज्याच्या बहुतांशी भागातील कमान तापमानात घट कायम

SCROLL FOR NEXT