Maize Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Maize Rate : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मका सरासरी २०८० रुपये प्रतिक्विंटल दराने विकत आहे.

Team Agrowon

Buldana News : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मका सरासरी २०८० रुपये प्रतिक्विंटल दराने विकत आहे. या बाजार समितीत मक्याची आवक सुधारली आहे. दीड हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक सध्या होत आहे.

विदर्भ, मराठवाडा व खानदेशच्या सीमेवर असलेल्या या बाजार समितीत मक्याची दरवर्षी मोठी उलाढाल होत असते. गेल्या काही काळापासून मक्याच्या लागवडीवर विपरीत परिणाम झालेला असल्याने आवकेवर परिणाम झालेला होता.

यंदाच्या हंगामातील मका तयार झाला असून तो विक्रीला येत आहे. या बाजार समितीत मक्याला कमाल २१३० रुपये दर मिळाला तर किमान १८०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. बाजारात प्रामुख्याने २०८० रुपयाचा सरासरी भाव अधिक मालाला मिळत आहे.

मक्याची परराज्यात पाठवणूक

मलकापूर बाजार समितीमध्ये खरेदी झालेला मका परराज्यात पाठविला जातो. तसेच देशभरातील व्यापारी या बाजारपेठेत खरेदीकडे लक्ष ठेवून असतात.

मक्याचा विविध क्षेत्रात वापर होत असल्याने येथील मक्याला चांगली मागणी राहते. विदर्भात ही बाजार समिती मक्याच्या उलाढालीसाठी प्रसिद्ध आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT