Onion Maize Harvesting : खानदेशात कांदा, मका काढणीस वेग

Onion and Maize Production : खानदेशात कांदा, मका, गहू कापणी व काढणीस वेग आला आहे. पुढे पावसाची शक्यता व्यक्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती असून, कापणी, मळणीचे काम गतीने सुरू आहे.
Onion and Maize
Onion and MaizeAgrowon

Jalgaon News : खानदेशात कांदा, मका, गहू कापणी व काढणीस वेग आला आहे. पुढे पावसाची शक्यता व्यक्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती असून, कापणी, मळणीचे काम गतीने सुरू आहे.

मजूरटंचाईत गहू काढणीत मोठ्या हार्वेस्टरची मदत होत आहे. एकरी १६०० ते १७०० रुपये गहू मळणीसाठी मोठे हार्वेस्टरचालक घेत आहेत. मका, दादर ज्वारी, ज्वारी कापणी व मळणीचे कामही सुरू आहे. यासाठी मजुरांची अधिकची गरज आहे. मका, ज्वारी कापणी, कणसे गोळा करण्यासंबंधी एकरी चार हजार रुपये मजुरी घेतली जात आहे.

Onion and Maize
Onion Export : दुबईला पुन्हा १० हजार टन कांदा निर्यातीचा घाट

मजूरटंचाई असल्याने शेतकऱ्यांना सात ते आठ दिवसांची प्रतीक्षा काम करून घेण्यासाठी करावी लागत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त असून, अधिकचा उत्पादन खर्च लागत आहे. ५ ते १० एप्रिलदरम्यान पावसाचे संकेत विविध हवामानशास्त्र विभागांनी दिले आहेत. यामुळे शेतकरी ५ एप्रिलपूर्वी कामे करून घेण्यासंबंधी धावपळ करीत असून, मजुरांअभावी दमछाक होताना दिसत आहे.

कांद्याची लागवड खानदेशात कमी झाली आहे. त्यात दरात घसरण झाली आहे. पुढे काढणी पूर्ण होऊन आवकही वाढेल. यामुळे शेतकरी लवकरात लवकर काढणी करून त्याची विक्री करण्यावर भर देत आहेत. कांद्याची ४० ते ४५ टक्के काढणी खानदेशात झाली आहे. काढणीचे काम या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे.

Onion and Maize
Maize Cultivation : पुणे विभागात साडे सात हजार हेक्टरवर मका

कारण कांद्याची लागवड डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात विविध टप्प्यांत झाली होती. जानेवारीच्या मध्यात लागवडीच्या कांद्यात पक्वता नाही. पक्वता येत असून, ही प्रक्रिया आणखी १० ते १२ दिवस सुरू राहील. यामुळे अनेकांची कांदा काढणी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल. या काळात उष्णता अधिक असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मजुरांची व्यवस्था करताना अडचणी येतील, असेही दिसत आहे.

अनेकांचा मका कापणी होऊन कणसे वाळत आहे. कणसे गोळा करण्याचे काम प्रलंबित आहे. कणसे गोळा करून त्यांची मळणी करण्यासाठी ट्रॅक्टरच्या मळणी यंत्रांची गरज असते. या यंत्रांसाठी देखील शेतकऱ्यांना मळणीयंत्र चालकांकडे चकरा माराव्या लागत आहेत. मक्याची जशी स्थिती आहे, तशी ज्वारीची देखील स्थिती आहे. ज्वारीची कापणी करून कणसे खुडून ती वाळत पडली आहेत. अनेक भागांत हीच स्थिती आहे. कणसे गोळा करण्यासाठी मजुरांच्या विनवण्या शेतकऱ्यांना कराव्या लागत आहेत.

केळी, पपई काढणीचीही धावपळ

पावसाच्या भीतीने मागील आठवड्यापासून पपई, केळी काढणीसही वेग आला आहे. पाऊस आल्यास रस्ते खराब होतात. रस्ते वाळून व्यवस्थित होण्यास सात ते आठ दिवस लागतात. यामुळे शेतकरी पपई व केळीची काढणी करून घेत आहेत. पिके काढणी, कापणी व मळणीवर आहेत. अशात उष्णता वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीदेखील वाढल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com