Green Fuel India Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ethanol Policy: धान्यापासून मद्यार्क धोरण जाहीर

Grain To Ethanol: महाराष्ट्र शासनाने केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इथेनॉल निर्मितीसाठी नवे धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत साखर कारखान्यांसह इथेनॉल प्रकल्पांना आता मळीसह धान्यापासूनही जलरहित मद्यार्क तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: राज्यातील साखर कारखान्यांबरोबरच केवळ इथेनॉल निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये मळीसह धान्यापासून मद्यार्क निर्माण करता येणार आहे. तसेच हा मद्यार्क केवळ जलरहित मद्यार्कासाठी वापरता येणार आहे. केंद्र सरकारच्या इथेनॉलनिर्मिती धोरणानुसार राज्य सरकारने धोरण जाहीर केले आहे.

राज्यात वाहन इंधनामध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यामुळे साखर, साखरेचा पाक, उसाचा रस, बी हेवी मळी, सी हेवी मळी यापासून इथेनॉलनिर्मिती केली जाते. या प्रकल्पांमध्ये मळीसह धान्यापासून दुहेरी स्रोतांद्वारे जलरहित मद्यार्कनिर्मिती करण्याबाबत धोरण निश्चित केले आहे.

दुहेरी स्रोत पद्धत धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आसवणींमध्ये धान्याची साठवणूक करण्याची योग्य व्यवस्था असावी. आसवणींमध्ये येणाऱ्या कच्च्या मालानुसार स्वतंत्र रिसिव्हर टाक्या आणि स्वतंत्र साठवणूक टाक्यांची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यानुसार उतारा नोंद करण्यात येणार आहे

धान्यापासून मद्यार्क प्राप्त झाल्यनांतर उर्वरित धान्याचा चोथा प्रक्रिया करून योग्य रितीने विल्हेवाट लावण्याबाबत आवश्यक यंत्रणा तयार करण्याची जबाबदारी प्रकल्पांची आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषाप्रमाणे व्यवस्था असावी असे धोरणात नमूद आहे.

एका स्रोतापासून उत्पादन घेणे बंद केल्यानंतर एका वेळी प्रक्रिया लाईनमध्ये एका फीडस्टॉकसह कार्यरत राहील. तसेच दुसऱ्या स्रोतापासून मद्यार्कनिर्मिती करायची असल्यास १५ दिवस आधी संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व प्रभारी पर्यवेक्षीय अधिकारी यांना कळविणे बंधनकारक आहे.

मळी आधारित आसवणी घटकांना मळीसह धान्यापासून दुहेरी स्रोतांद्वारे जलरहित मद्यार्कनिर्मिती करता येईल. तथापि, धान्यापासून मद्यार्क केवळ जलरहित मद्यार्कासाठी वापरता येणार आहे. तयार मद्यार्क पेय मद्यासाठी पावरता येणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Zilla Parishad elections : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांना १५ दिवसांची मुदत वाढ; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Revenue Service: महसूल सेवा आता व्हॉट्सअॅपवर

Fertilizer Management: अन्नद्रव्यांच्या कार्यक्षम पुरवठ्यासाठी विद्राव्य खतांचा वापर

Rice Export: तांदूळ निर्यात वाढवण्यासाठी छत्तीसगड सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Jijau Jayanti: जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघातर्फे विविध कार्यक्रम

SCROLL FOR NEXT