
Kolhapur News: देशात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. यंदाच्या जूनमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण १९.९ टक्क्यांपर्यंत गेले आहे. पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाच्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५ पर्यंत एकत्रित सरासरी मिश्रण दर १८.९ इतके झाले आहे.
जून २०२५ मध्ये तेल विपणन कंपन्यांना ८७.५ कोटी लिटर इथेनॉल मिळाले. नोव्हेंबर-जून कालावधीत एकत्रित इथेनॉलचा वापर ६३७.४ कोटी लिटर झाला. केंद्र सरकारने २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे लक्ष्य ठेवले होते, ते नंतर २०२५ पर्यंत सुधारित करण्यात आले. सध्याची १९.९ टक्क्यांची आकडेवारी पाहता, हे लक्ष्य लवकरच गाठले जाईल, अशी अपेक्षा आहे. यासाठी साखर कारखाने आणि डिस्टिलरीजनी इथेनॉल उत्पादन वाढविण्यात मोठी भूमिका बजावली असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
२०१३-१४ या इथेनॉल पुरवठा वर्षात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण अत्यंत कमी म्हणजे केवळ १.५३ टक्के होते. या वर्षात तेल कंपन्यांना फक्त ३८ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला होता. २०१४ मध्ये एकूण इथेनॉल उत्पादन क्षमता सुमारे ४२१ कोटी लिटर होती. २०२५ पर्यंत ही क्षमता १,६४८ कोटी लिटरपर्यंत पोहोचली.
ज्यात मोलॅसिस आणि धान्य-आधारित दोन्ही डिस्टिलरीजचा समावेश आहे. २०१३-१४ या वर्षातील १.५३ टक्के मिश्रणावरून हे प्रमाण सातत्याने वाढत गेले आहे. जून २०२२ मध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट वेळेच्या पाच महिने आधीच गाठले होते.
इथेनॉल मिश्रणामुळे भारताच्या परकीय चलनात लक्षणीय बचत झाली आहे. एका दशकात २०१४ पासून इथेनॉल मिश्रणामुळे भारताने १ लाख कोटींहून अधिक परकीय चलनाची बचत केली. या बचतीमुळे भारताची ऊर्जा सुरक्षा वाढली आहे. कारण इंधनासाठी परदेशी देशांवरील अवलंबित्व कमी झाल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.
वर्ष सरासरी मिश्रण (टक्के)
२०२०-२१ ८.१७
२०२१-२२ १०
२०२२-२३ १२.०६
२०२३-२४ १४.६
२०२४-२५ १८.९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.