Pune News: राज्यात उन्हाचा चटका वाढत आहे. तापमानात वाढ झाल्याने दुपारी उकाडाही जाणवत आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान होते. तर राज्यातील उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. .कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामान होते. उद्याही पाळगर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज देण्यात आला आहे..Maharashtra Heatwave: अकोला ठरले देशात उष्ण.तापमानात वाढ झाल्याने राज्यातील बहुतांशी भागात उन्हाचा चटकाही वाढत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तसेच उत्तर महाराष्ट्रातील तापमानात मागील काही दिवसांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. .Weather Update: विदर्भातील सर्वच भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ.उत्तर भारतातही किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. देशातील किमान तापमान आज अयोध्या येथे नोंदले गेले. उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती..तर कमाल तापमान ओडिशातील झारसुगुडा येथे ३९ अंश सेल्सिअसची नोंद झाली. देशातील तापमानातही पुढील काळात वाढ होण्याचा अंदाज आहे. तर राज्यातही तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.