Pune News: राज्यातील २ हजार ५०० शासकीय पशुवैद्यक आणि ४ हजार पशुधन पर्यवेक्षकांनी आंदोलन करत १० मार्चला सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या धोरणांविरोधात राज्यभर टप्प्याटप्प्याने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाची तीव्रता वाढल्यास शासकीय पशु रुग्णालयातील सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरण, उपचार आणि कृत्रिम रेतन सेवा ठप्प झाल्यास पशुपालक शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो..पशुवैद्यकांवर अतिरिक्त कामाचा बोजा…महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने पशुसंवर्धन विभागाच्या काही धोरणांविरोधात राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार राज्यात पशुवैद्यकांची संख्या कमी आहे. एका पशुवैद्यकावर अनेक गावांची जबाबदारी टाकली जाते. आधीच कामाचा ताण असताना रात्री उशिरापर्यंत तातडीच्या सेवा देण्याची अपेक्षा ठेवली जाते, असा आरोप संघटनेने केला आहे..Veterinary Officer Shortage: बागलाण तालुक्यात पशुवैद्यकीय विभागात ४१ पदे रिक्त.संघटनेने पशुवैद्यक विभागावर केले आरोप…शासकीय पशु दवाखान्यांच्या वेळा कोणतेही स्पष्ट कारण न देता बदलण्यात आल्या आहेत. फील्डवर्कचा भार वाढलेला असतानाही बायोमेट्रिक उपस्थिती सक्तीची करण्यात आली आहे. तसेच सतत ऑनलाइन अहवाल देणे आणि विविध अॅपवर माहिती अपडेट ठेवण्याचा दबाव टाकला जात असल्याचे सांगितले जाते. अतांत्रिक कामे करून घेतली जात असल्याने पशुवैद्यकीय सेवेकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे..Veterinary Law: पशुवैद्यकांकडून कायदा धाब्यावर.आंदोलनाची धग अजून वाढणार…या आंदोलनाची सुरुवात २ मार्चपासून झाली आहे. सुमारे अडीच हजार पशुवैद्यकांनी शासनाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप गटांवर बहिष्कार टाकला आहे. ४ मार्च रोजी सर्व पशुवैद्यक काळ्या फिती लावून काम करणार आहेत. ५ मार्च रोजी सामूहिक रजा घेण्यात येणार आहे. ६ मार्चपासून शासकीय अहवाल देणे बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर ९ मार्च रोजी राज्यभर उपोषण करण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास १० मार्च रोजी २ हजार ५०० पशुवैद्यक आणि ४ हजार पशुधन पर्यवेक्षक सामूहिक राजीनामे देतील, असा इशारा देण्यात आला आहे..दरम्यान, हे आंदोलन वाढल्यास लसीकरण, तातडीचे उपचार आणि कृत्रिम रेतन यांसारख्या सेवा बंद पडू शकतात. त्यामुळे दूध उत्पादन आणि पशुपालन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील शेतकरी पशुधनासाठी मोठ्या प्रमाणात शासकीय दवाखान्यांवर अवलंबून असतात. त्यामुळे सामूहिक राजीनाम्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांची अडचण वाढू शकते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.