Thane News: मुरबाड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणालीची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वामन खाकर यांनी पंचायत समिती मुरबाडच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक प्रणाली तत्काळ लागू करण्याचे लेखी आदेश जारी केले आहेत..ग्रामविकास विभागाच्या शासन पत्रांसह सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार, कोविड काळातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदविणे बंधनकारक केले आहे..Biometric Attendance: बायो मेट्रिक,जिओ फेंन्सिगला कृषी विभागात कडाडून विरोध.त्यानुसार सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी कार्यालयात येताना व जाताना बायोमेट्रिक मशीनवर हजेरी नोंदविणे अनिवार्य राहील, असे आदेशात स्पष्ट आहे. संबंधित सूचनांचे तत्काळ पालन करून अनुपालन अहवाल पंचायत समिती कार्यालयाला सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत..Biometric Attendance : हजेरी लावतो, कामात सुसूत्रता आणा.आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकारी वैयक्तिकरीत्या जबाबदार राहतील आणि शासकीय नियमांनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. .मात्र, तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित नसल्याबाबत तक्रारी आल्यानंतर आणि सामाजिक स्तरावरून मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा आदेश काढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या कारभारात शिस्त, पारदर्शकता व वेळेचे पालन सुनिश्चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे..मुरबाड गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयाची कर्मचार्यांनी काटेकोर अंमलबजावणी झाल्यास ग्रामपंचायत कारभारात शिस्त व पारदर्शकता निश्चितच वाढेल.- वामन खाकर, सामाजिक कार्यकर्ते.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.