Kabuli Chana Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Supply: काबुली हरभरा आवक कमी

Khandesh Market Update: खानदेशात मोठ्या काबुली हरभऱ्याची बाजारात सध्या मर्यादित आवक असून दर टिकून आहेत. आठवड्यातून दोन-तीन वेळा होणाऱ्या आवकेत शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो आहे.

Team Agrowon

Jalgaon News: खानदेशात मोठ्या काबुली हरभऱ्याची बाजारातील आवक कमी आहे. सध्या आठवड्यातून दोन ते तीन वेळेस प्रमुख बाजारांत आवक होत असून, दर कमाल ११२०० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे. दर टिकून असल्याने तेवढा शेतकऱ्यांना लाभ होत आहे.

खानदेशात काबुली हरभरा पिकाच्या क्षेत्रात सतत वाढ होत आहे. यंदाची पेरणी जानेवारीपर्यंत सर्वत्र झाली होती. सुमारे २८ ते ३० हजार हेक्टरवर ही पेरणी होती. खानदेश मोठ्या काबुली हरभऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यास गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, बडोदा, मध्य प्रदेशातील इंदूर, भोपाल व राज्यातील अनेक बाजारांत मागणी असते. त्याचे दरही देशी किंवा तपकिरी, फिकट गुलाबी हरभऱ्याच्या तुलनेत अधिक असतात.

त्याची पेरणी जळगावातील चोपडा, रावेर, यावल, धुळ्यातील शिरपूर या भागात केली जाते. याच भागात त्याचे मोठे क्षेत्र असते. परंतु यंदा काबुलीची पेरणी खानदेशात सर्वत्र होत आहे. या हरभऱ्याची पेरणी काढणी पूर्ण झालेल्या केळी बागा, कापसाखालील रिकाम्या झालेल्या क्षेत्रात केली जाते. त्यास सिंचनासाठी पाण्याची गरज इतर हरभरा पिकांच्या तुलनेत अधिक असते.

मोठ्या काबुलीचे बियाणेही महाग होते. त्याची पेरणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अनेक जणांनी केली. अनेकांनी नोव्हेंबर व या महिन्यात पेरणी केली. २२०४ मध्ये पाऊसमान चांगले राहिल्याने मोठ्या काबुलीची पेरणी वाढली होती. तर दरही बऱ्यापैकी राहीले.

सुरुवातीला किमान दर ९३०० व कमाल दर १०५०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. एप्रिलमध्ये दर कमी होते. परंतु एप्रिलच्या अखेरीस दरवाढ सुरू झाली. यानंतर कमाल दरपातळी ११ हजार रुपयांवर पोचली. पण नंतर आवकही कमी होत गेली. सध्या खानदेशातील चोपडा, अमळनेर व शिरपूर या बाजारांत काबुलीची आवक आठवड्यातून दोन ते तीन दिवस होत आहे. आठवड्यात ३०० ते ३५० क्विंटल आवक होत आहे. सर्वाधिक आवक शिरपुरात होते, अशी माहिती मिळाली.

शेतकऱ्यांची काबुलीस पसंती

खानदेशात रब्बीत हरभरा प्रमुख पीक आहे. पण त्यात चांगले दर देणारा हरभरा पीक म्हणून लहान व मोठ्या काबुलीस शेतकरी पसंती देतात. खानदेशात देशी व अन्य हरभरा पिकांची एकूण पावणेदोन लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात हरभरा पीक होते. काळ्या कसदार जमिनीत कमी पाण्यात येणारे हरभरा वाणही असल्याने कमी पाणी व कमी खर्चात येणारे पीक म्हणून हरभऱ्यास पसंती दिली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT