Malegaon News: बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली..(स्व.) अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या कारखान्यावर दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री नीलकंठेश्वर पॅनेलचे वर्चस्व राहिले होते. त्यांच्या निधनानंतर अध्यक्षपद कोणाकडे जाणार याकडे सभासदांचे लक्ष लागले होते. संचालक मंडळाने सुनेत्रा पवार यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली होती. त्यानुसार १२ मार्च रोजी झालेल्या बैठकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. इतर कोणताही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली..Market Committee Name: बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीला अजित पवार यांचे नाव देणार.निवडीनंतर संचालक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष संगीता कोकरे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, संचालक योगेश जगताप, नितीन सातव, स्वप्नील जगताप, विजय तावरे, कार्यकारी संचालक अशोक पाटील यांच्यासह संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..Women Empowerment: महिला शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी विशेष विधेयक आणणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार.या वेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, की सभासद, संचालक व कामगारांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. अजित पवारांनी कारखान्याला दिलेले बळ कायम ठेवत सर्वांना सोबत घेऊन कारखान्याची प्रगती साधण्याचा प्रयत्न करणार आहे. सभासदांना सर्वाधिक ऊसदर देऊन कारखाना राज्यात अव्वल करण्याचा ध्यास घेईन..अध्यक्ष, उपाध्यक्षपदी महिला विराजमानअजित पवार यांच्या निधनानंतर माळेगाव कारखान्याच्या सभासदांमध्ये दुःखाचे वातावरण होते. सुनेत्रा पवार यांनी अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी कार्यक्षेत्रातून होत होती. त्यानुसार ही निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्हीही पदांवर महिला असणारा माळेगाव सहकारी साखर कारखाना हा राज्यातील एकमेव साखर कारखाना ठरला आहे, अशी माहिती कारखान्याच्या वतीने देण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.