Jalna News : येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्याला मक्याची १,१४५ क्विंटल आवक झाली. १२६ ते ३०३ क्विंटल दरम्यान कमीअधिक प्रमाणात आवक झालेल्या मक्याला १,९५० ते २,०११ रुपये प्रतिक्विंटल दरम्यान सरासरी दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
जालना बाजार समितीमध्ये १५ ते २१ जून दरम्यान बाजरीची ३ हजार ९५ क्विंटल आवक झाली. ३९८ ते ६६३ क्विंटल दरम्यान आणि अधिक प्रमाणात आवक झालेल्या बाजरीला सरासरी २४०० ते २४७५ रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला.
काबुली हरभऱ्याची एकूण आवक १७ क्विंटल झाली. दोन ते आठ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या काबुली हरभऱ्याला ५,६०० ते ६,१०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. साध्या हरभऱ्याची एकूण ३,३३८ क्विंटल झाली ३९३ ते १,००६ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या हरभऱ्याला ५,३७५ ते ५,४५० प्रतिक्विंटल दरम्यान दरम्यान मिळाला.
पांढऱ्या तुरीची एकूण आवक ३,८३५ क्विंटल झाली. ५३३ ते ७१८ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या पांढऱ्या तुरीला ५,४०० ते ६,५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. शाळू ज्वारीची एकूण आवक ७,७२० क्विंटल झाली. ८६९ ते १,४७२ क्विंटल दरम्यान कमीअधिक प्रमाणात आवक झालेल्या शाळू ज्वारीला सरासरी २,५०० ते २,६११ रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळाला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.