Poultry Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Poultry Industry: भारतातील पोल्ट्री उद्योग निर्णायक वळणावर

Rising Poultry Feed Price: पोल्ट्री उद्योगासमोर खाद्यावरील वाढता खर्च, पुरवठा साखळीतील विस्कळीतपणा आणि बाजारातील अस्थिरता यामुळे समस्या वाढल्या आहेत. या समस्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी पोल्ट्री मूल्यसाखळीतील सर्व घटकांनी एकत्र येणे आवश्यक आहे.

Team Agrowon

Pune News: पोल्ट्री उद्योगासमोर खाद्यावरील वाढता खर्च, पुरवठा साखळीतील विस्कळीतपणा आणि बाजारातील अस्थिरता यामुळे समस्या वाढल्या आहेत. या समस्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी पोल्ट्री मूल्यसाखळीतील सर्व घटकांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे आवाहन ‘सीएलएफएमए’चे अध्यक्ष दिव्य कुमार गुलाटी यांनी केले.

पुण्यात नुकतेच सीएलएफएमएचे पोल्ट्री इन इंडिया या विषयावर चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्रात पोल्ट्री खाद्य उत्पादक, पोल्ट्री उत्पादक, पोषण तज्ज्ञ, धान्य पुरवठादार आणि संशोधकांनी भाग घेतला. या वेळी श्री. गुलाटी यांनी पोल्ट्री व्यवसायासमोरील आव्हाने आणि संधी यावर मार्गदर्शन केले.

श्री. गुलाटी म्हणाले, की भारतातील पोल्ट्री उद्योग एका निर्णायक वळणावर आहे. या उद्योगासमोर सध्या खाद्याच्या वाढत्या किमती, पुरवठा साखळीतील विस्कळीतपणा आणि बाजारभावातील अस्थिरतेचे आव्हान आहे. त्यामुळे आता योग्य वेळी हस्तक्षेप आणि धोरणात्म परस्पर सहकार्य आवश्यक बनले आहे. खाद्याच्या वाढत्या दरामुळे पोल्ट्रीचा उत्पादन खर्च वाढत आहे. त्यातही मका आणि सोयाबीनच्या भावामुळे उद्योगावर परिणाम होत आहे. पोल्ट्रीचे दरही स्थिर नसतात. मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून येतात.

“क्रिसीलच्या ताज्या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात म्हणजेच २०२५-२६ मध्ये वाढती मागणी आणि वापरामुळे पोल्ट्री उद्योगाची वाढ ८ ते १० टक्क्यांनी होण्याची शक्यता आहे. मका आणि सोयाबीन सारख्या पशुखाद्याच्या वाढत्या दरामुळे पोल्ट्री उद्योगाचा नफा अर्ध्या टक्क्याने कमी होण्याचा अंदाज आहे. मका आणि सोयाबीनचा पोल्ट्रीच्या खाद्यात ९० टक्के वाटा असतो,” असेही श्री. गुलाटी म्हणाले.

चर्चासत्रात अमेरिका ग्रेन कौन्सिलचे विभागीय सल्लागार अमित सचदेव यांनी भारतीय पशुखाद्याची सद्यःस्थिती या विषयावर मार्गदर्शन केले. अमेरिका ग्रेन काऊंसिलचे संचालक रिस केन्नेडी यांनी अमेरिका ज्वारीः एक संभाव्य उपाय या विषयावर प्रकाश टाकला. तसेच बिहार पशुधन विज्ञान विद्यापीठाच्या पशुधन पोषण विभागाचे प्राध्यापक पंकज कुमार सिंह यांनी पशुधन आणि पोल्ट्रीच्या खाद्यात वाढता डीडीजीएसचा वापर यावर मार्गदर्शन केले. डीडीजीएसमुळे पशुद्यावरील खर्च कमी करून खाद्याचा कार्यक्षम वापर शक्य असल्याचे प्रा. सिंह यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Marriage Problems: ग्रामीण भागातील लैंगिक कोंडमारा

Interview with IAS Varsha Ladda Untwal: मनुष्यबळाचा प्रश्‍न सोडविण्याला पहिले प्राधान्य

Agriculture Loan Waiver: शेतकऱ्यांची राजकीय ताकद उभी राहील का?

Wildlife Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसानीची भरपाई कशी मिळते?

Weekly Weather: हलक्या, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT