Poultry Farming: वाढत्या तापमानात कुक्कुटपक्ष्यांचे आरोग्य उत्तम राखण्यावर भर

Poultry Management: साताऱ्यातील अजय साळुंखे यांनी ब्रॉयलर कुक्कुटपालनात बदलत्या हवामानाचा अभ्यास करून स्मार्ट व्यवस्थापन विकसित केले आहे. वाढत्या तापमानात पक्ष्यांचे आरोग्य टिकविणारे त्यांच्या यशाचे सूत्र ठरले आहे.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon
Published on
Updated on

Ajay Salunkhe Poultry Success Story:

शेतकरी नियोजन । ब्रॉयलर कुक्कुटपालन

शेतकरी : अजय राजाराम साळुंखे

गाव : बोरगाव, ता. जि. सातारा

एकूण शेड : २

शेड पक्षीक्षमता : ५ हजार

बोरगाव (ता. जि. सातारा) येथील अजय राजाराम साळुंखे हे उच्चशिक्षित शेतकरी आहेत. अजय यांनी बागायती शेतीला कुक्कुटपालनाची जोड दिली आहे. शेतामध्ये ऊस, आले यांसह हंगामी पिकांची लागवड केली जाते. अजय यांचे एमएस्सी ॲग्रीचे शिक्षण झाले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ नोकरी केली. नोकरी करत असताना एका खासगी कंपनीसोबत करार पद्धतीने ब्रॉयलर कुक्कुटपालन व्यवसायास सुरुवात केली.

Poultry Farming
Broiler Poultry Farming: ब्रॉयलर कुक्कुटपालनात आरोग्य, खाद्य व्यवस्थापनावर भर

कुक्कुटपालनातून चांगले आर्थिक उत्पन्न हाती येत असल्याने नोकरी सोडून पूर्णवेळ कुक्कुटपालन व्यवसायात लक्ष देण्याचे ठरविले. सुरुवातीच्या काळात आलेल्या अडचणींवर अनुभवी पोल्ट्री उत्पादकांसोबत चर्चा करून मात केली. हंगामनिहाय युनिटमध्ये आवश्यक बदल करत पक्ष्यांचे आरोग्य उत्तम राखण्यावर भर दिला जातो. सध्या तापमानात चांगलीच वाढ झाल्याने चालू बॅचमधील पक्ष्यांची संख्या कमी ठेवण्यावर भर दिला असल्याचे अजय साळुंखे सांगतात.

शेड उभारणी

कुक्कुटपालनासाठी २००८ मध्ये पूर्व-पश्चिम दिशेची दोन शेडची उभारणी केली. त्यापैकी एक शेड २०० फूट लांब आणि २८ फूट लांबी रुंदीचे, तर दुसरे शेड १०० फूट लांब आणि १८ लांबी रुंदीचे आहे. दोन शेडची मिळून सुमारे ५००० पक्षी क्षमता आहे. एका खासगी कंपनीसोबत करार पद्धतीने कुक्कुटपालन करण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे.

अडचणींवर अनुभवातून मात

सुरुवातीच्या काही बॅचमध्ये थोड्या अडचणी आल्या. मात्र करार केलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत आणि अनुभवी पोल्ट्री उत्पादकांसोबत चर्चा करून येणाऱ्या अडचणींवर मात करण्यात यश आले. हळूहळू व्यवसायात चांगला जम बसू लागला. त्यातून नोकरीतील पगारापेक्षा व्यवसायातून चांगले अर्थकारण होऊ लागल्याने अजय यांनी २०१६ मध्ये नोकरी सोडून पूर्णवेळ पोल्ट्री व्यवसायात लक्ष देण्यास सुरुवात केली. व्यवसायात प्रत्यक्ष लक्ष देण्यास सुरुवात केल्यापासून त्यातील बारकावे समजू लागले.

Poultry Farming
Poultry Farming : पोलिस सेवेतून निवृत्त, आता देशी पोल्ट्री व्यवसायात यशस्वी

पक्ष्यांमध्ये हंगामनिहाय होणारे बदल समजून घेत त्यानुसार बॅच नियोजन करण्यास प्राधान्य दिले. कुक्कुटपक्ष्यांच्या शेडमधून उत्तम दर्जाचे कोंबडी खत उपलब्ध होऊ लागले. त्याचा स्वतःच्या शेतामध्ये वापर केला. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च नियंत्रित करण्यात यश मिळाले. शिवाय शिल्लक राहिलेल्या कोंबडीखताची विक्री केली जाते. प्रति बॅच ५ ते ७ ट्रॉली कोंबडखत उत्पादन मिळते.

व्यवस्थापनातील बाबी

वर्षाकाठी पाच ते सहा बॅचचे नियोजन.

एक बॅच साधारणपणे ३५ ते ४५ दिवसांची.

बॅचनुसार पक्ष्यांची संख्या ठरविली जाते.

साधारणपणे ३५ ते ४५ दिवसांच्या कालावधीत अडीच किलो वजनाचे पक्षी मिळतात.

एक बॅच संपल्यानंतर शेड निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेसाठी २० दिवसांचा कालावधी मोकळा ठेवला जातो.

बॅच संपल्यानंतर शेडच्या निर्जंतुकीकरणावर भर. त्यासाठी चुना आणि मोठ्या मिठाचा वापर.

पक्ष्यांना कोणत्याही आजाराची बाधा होऊ नये यासाठी शेडच्या स्वच्छतेवर भर.

प्रत्येक बॅच संपल्यानंतर शेडमधील खत बाहेर काढले जाते.

नवीन बॅचमधील पिले शेडवर आणण्यापूर्वी खाद्य आणि पाण्याची भांडी स्वच्छ करून निर्जंतुकीकरण केले जाते.

शेडमध्ये साप, धामण या सारखे सरपटणारे प्राणी येऊ नयेत यासाठी उपाययोजनांवर भर.

पक्ष्यांना पुरेसे, स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध करण्यावर भर.

पिण्याच्या पाइपमध्ये शेवाळ तयार होऊ नये यासाठी नियमितपणे पाइप स्वच्छतेवर भर.

पाण्याचा पीएचची (सामू) नियमित तपासणी.

युनिटमध्ये तुसाचा वापर करण्यास प्राधान्य.

बदलत्या हंगामानुसार पक्ष्यांची संख्या ठरविली जाते.

गरजेप्रमाणे पाणी पक्षांना दिले जाते. यामुळे मर कमी होण्याचा प्रमाण कमी राहते.

नियमित आरोग्य तपासणीवर भर. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक लसीकरण.

ऋतुनिहाय व्यवस्थापन पद्धतीत बदल करण्यास प्राधान्य.

उन्हाळ्यातील नियोजन

उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांच्या शरीरावर ताण येतो. पक्षी खाद्य कमी खातात आणि पाणी जास्त पितात. त्यामुळे शेड व्यवस्थापनात योग्य बदल करण्यास प्राधान्य दिले जाते.

उन्हाळ्यात प्रति बॅचमधील पक्ष्यांच्या संख्या कमी ठेवण्यावर भर दिला जातो. प्रतिपक्षी साधारण दीड फूट जागा याप्रमाणे ४७०० ते ४८०० अशी पक्ष्यांची संख्या ठेवली जातात. यामुळे पक्ष्यांना जास्त जागा मिळते. त्यामुळे वाढ चांगली होऊन मरतुक कमी होते.

उन्हामुळे पिण्याचे पाणी गरम होते, त्यामुळे टाकीतील पाणी दिवसातून दोन वेळा बदलेले जाते. पक्ष्यांना थंड पाणी मिळावे, यासाठी पाण्याच्या टाक्यांना गोणपाट भिजवून बांधल्या जाते.

कुक्कुटपालन शेडमधील तापमान कमी करण्यासाठी फॉगर व फॅनचा वापर आहे.

थंड पाण्यासाठी टाकीत कोरफडीचा वापर केला जातो.

उन्हाळ्यात शेडमध्ये उष्ण वारे येतात. त्यामुळे शेडमध्ये उष्णता निर्माण होते. त्याचा पक्ष्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. उष्ण वारे शेडमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी शेडच्या बाजूने पडदे लावले जातात.

अजय साळुंखे ८९५६१८८५८५

(शब्दांकन : विकास जाधव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com