Rice Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Rice Export Ban: भारताच्या तांदूळ निर्यातबंदीने जगाची चिंता वाढली

India Rice Export : भारताने गुरुवारी अचानक बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. देशात तांदळाचे भाव वाढल्याने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्राने निर्यातबंदीचा निर्णय घेतला.

Team Agrowon

Pune News : भारताने गुरुवारी अचानक बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. देशात तांदळाचे भाव वाढल्याने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्राने निर्यातबंदीचा निर्णय घेतला. जागतिक पातळीवर आधीच तांदळाचे भाव ११ वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. त्यातच भारताने तांदूळ निर्यातीवर बंदी घातली. यामुले जगाची चिंता वाढल्याचे सांगितले जाते. मग भारताने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाची निर्यात बंद केल्याने जगाची चिंता वाढली आहे.

जून महिन्यात मध्य आणि दक्षिण भारतात कमी पाऊस पडला. त्यामुळे भात लागवडी रखडल्या. परिणामी लागवडीला उशीर झाला. यामुळे उत्पादकता घटण्याचा अंदाज आहे. तर मागील दोन आठवड्यांपासून पंजाब आणि हरियाना राज्यात जोरदार पावसाने पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही भागात शेतकऱ्यांवर तांदळाची दुबार लागवड करण्याची वेळ आली. यामुळे तांदळाच्या भावात वाढ झाली.

पण पुढील वर्षात लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे शेतीमालाच्या भावात वाढ होऊ देण्याची जोखीम सरकार घेण्याच्या मनस्थितीत नाही. यापुर्वीच सरकारने गव्हाच्या निर्यातीवर सप्टेंबर २०२२ मध्ये बंदी घातली. आता सरकारने तांदळाचे भाव वाढल्यानंतर बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली.

जागतिक तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा ४० टक्के आहे. त्यामुळे भारताने तांदळाची निर्यात कमी केली तरी त्याचा लगेच परिणाम जागतिक तांदूळ दरावर होत असतो. आधीच रशिया युक्रेन युध्द आणि बदलत्या हवामानामुळे जागतिक तांदूळ दरात वाढ झालेली आहे. भारतातही तांदळाचे भाव वाढलेले आहेत. पण माॅन्सूनच्या पावसाला उशीर झाल्याने दरात महिनाभरात ३ टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे भारताने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

का केली निर्यातबंदी?

केंद्रीय अन्न मंत्रालयाने म्हटले की, देशात तांदळाच्या दरात वाढ झाली. मागील एक वर्षात देशातील तांदळाचे भाव ११.५ टक्क्यांनी वाढले आहेत. देशात बिगर बासमती पांढऱ्या तांदळाचा पुरेसा पुरवठा असावा आणि किमती स्थिर राहाव्यात यासाठी सरकारने निर्यात धोरणात बदल केला.

भारताने मागील हंगामात एकूण २२० लाख टन तांदळाची निर्यात केली. त्यापैकी १०० लाख टन बिगर बासमती पांढरा तांदूळ होता. म्हणजेच भारताच्या एकूण तांदूळ निर्यातीत बिगर बासमती पांढऱ्या तांदळाचे प्रमाण ४५ टक्के आहे. तर अर्ध उकडलेल्या तांदूळ ७४ लाख टन होता.

आयातदार देशांना पर्याय नाही

भारताने सरसकट बंदी घातली नसली तरी निर्यात मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेन युध्दामुले जागतिक गहू बाजार विस्कळीत झाला होता त्यापेक्षा कितीतरी पटीने भारताच्या या भुमिकेने तांदळाचा जागतिक बाजार विस्कळीत होणार आहे. भारताने अचानक बिगर बासमीत पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने आयातदार देशांना मोठा धक्का बसला. कारण या देशांना तांदूळ देणारा दुसरा देश नाही, असे निर्यातदारांनी सांगितले.

जागतिक पातळीवर टंचाई भासणार

आशिया खंडात तांदळाचे प्रामुख्याने उत्पादन होते. पण यंदा एल निनोमुले आशियात पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे. परिणामी तांदळाचे उत्पादनही घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तांदळाचे भाव गेल्या ११ वर्षातील उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. थायलंड आणि व्हिएतनाममध्ये तांदळाचा पुरेसा पुरवठा नाही त्यामुळे भारताच्या निर्यातबंदीनंतर हे देश तूट भरून काढू शकत नाहीत. बेनीन, सेनेगल, अयवोरी कोस्ट, टोगो, गिनी, बांगलादेश आणि नेपाळ हे भारतीय तांदळाचे मुख्य ग्राहक आहेत.

निर्यातीचे भाव

चालू आठवड्यात व्हिएतनामने तांदळाच्या किमतीत मोठी वाढ केली. व्हिएतनाम ५ टक्के तुकडा तांदूळ ५१५ ते ५२५ डाॅलर प्रतिटनाने निर्यात करत आहे. हा भाव २०११ नंतरचा सर्वाधिक ठरला. भारत ५ टक्के अर्ध उकडलेला तांदूळ ४२१ ते ४२८ डाॅलर प्रतिटनाने निर्यात करत आहे. भारताचा हा भावही पाच वर्षातील उच्चांकी आहे.

दरवाढीचा अंदाज

भारताने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाची निर्यात बंद केली. त्यामुळे खेरदीदार देश थायलंड आणि व्हिएतनामकडून खरेदी करू शकतात. परिणामी ५ टक्के तुकडा तांदळाच्या दरात मोठी वाढ होऊन ६०० डाॅलर प्रतिटनांवर पोचण्याची शक्यता आहे, असे व्यापारी सांगत आहेत. यामुळे संपूर्ण जगाला तांदूळ भाववाढीचा सामना करावा लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT