Beed News: ता. १३ (बातमीदार) : शासनाने कृषिपंपासाठी सौर संच विहिरीवर बसविणे सक्तीचे केले असून मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सुरू केली आहे. मात्र जमिनीतील पाण्याची पातळी सातत्याने खालावत चालल्यामुळे विंधन विहिरींसाठी ५ किंवा त्यापेक्षा अधिक अश्वशक्तीच्या (एचपी) मोटरची गरज भासत आहे. दरम्यान, या योजनेत ५ एकरपेक्षा अधिक शेतजमिनीची अट आहे. त्यामुळे अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे प्रश्न वाढले असून ही योजना माजलगाव तालुक्यात प्रत्यक्षात कुचकामी ठरत आहे..सौर ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी शासनाने धोरण अवलंबले आहे. शेतातील कृषिपंपावर विजेचा सर्वाधिक वापर होतो, ही बाब विचारात घेऊन मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राबविली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३ एचपीच्या सौर कृषिपंपासाठी ५ एकरपर्यंत, तर ५ किंवा ७.५ एचपीच्या कृषिपंपासाठी ५ एकरपेक्षा अधिक शेतजमिनीची अट आहे..Solar Pump Scheme: अठरा हजारांवर शेतकऱ्यांना सौरकृषिपंपाची प्रतीक्षा.माजलगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांत दुष्काळी परिस्थिती, कमी पाऊस, भूजल पुनर्भरणातील कमतरता यांसारख्या अनेक कारणांमुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खाली गेली आहे. बहुतांश विंधन विहिरींना ३०० ते ४०० फूट खाली पाणी लागत आहे. साध्या विहिरींना ६० ते ८० फूट खोदल्याशिवाय पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत तीन एचपीचा पंप कार्यक्षम राहत नाही. पाणी उपसण्यासाठी ५ किंवा ७.५ एचपीच्या पंपाचीच आवश्यकता भासते. मात्र, योजनेतील शेतजमिनीची कठोर अट छोट्या शेतकऱ्यांना परवडणारी नाही. ‘इतकी जमीन आणायची कुठून?’, ‘तसेच अशा विहिरी घेऊच नयेत का?’.Solar Pump Scheme : सौर कृषिपंप योजनेत कंपन्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक.या योजनेतील अटींमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. तांत्रिक मर्यादा, मोठ्या क्षमता असलेल्या पंपांवरील खर्च, तसेच सौर संचांच्या देखरेखीसाठी आवश्यक असलेली तांत्रिक माहितीही लहान शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसते. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून विंधन विहिरी खोदल्या आहेत. मात्र, सौर पंपाच्या अटीमुळे त्या विहिरी प्रत्यक्षात उपयोगातच येत नाहीत.- अंकुश राठोड, शेतकरी, छोटेवाडी.भूधारकतेची अट शिथिल करून पंप क्षमतेनुसार स्पष्ट आणि न्याय्य निकष ठरविणे, लहान शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र श्रेणी निर्माण करणे, अल्पभूधारकांसाठी अनुदानात वाढ करणे यांसारख्या मागण्या जोर धरत आहेत. योग्य तो बदल न झाल्यास हजारो शेतकऱ्यांचे उत्पन्न, पिकांचे उत्पादन आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या अटी तातडीने शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.-नितीन डाके, शेतकरी, डाके पिंपरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.