Exports of Broken Rice : तुकडा तांदूळ निर्यातीस केंद्राची परवानगी

Centre Approved Exports : भारत सरकारने सेनेगल, गांबिया आणि इंडोनेशिया या तीन देशांमध्ये तुकडा तांदळाच्या निर्यातीस मंजुरी दिली.
Basamati Rice Export
Basamati Rice Exportagrowon
Published on
Updated on

Rice Exports : भारत सरकारने सेनेगल, गांबिया आणि इंडोनेशिया या तीन देशांच्या मागणीनंतर तुकडा तांदळाच्या निर्यातीस परवानगी दिली आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) दिली.

केंद्र सरकारने ८ सप्टेंबर २०२२ रोजी तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतर मे २०२३ महिन्यात त्यात सुधारणा करून ज्या देशांना त्यांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तांदळाची आवश्यकता आहे. त्यांनी मागणी केल्यास तुकडा तांदूळ निर्यात करण्याची सरकारने परवानगी दिली.

परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने मंगळवारी जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, ज्या निर्यातदारांनी गेल्या तीन वर्षांत सर्व प्रकारचे तांदूळ सेनेगल, गाम्बिया आणि इंडोनेशियाला निर्यात केले आहेत त्यांनाच तुकडा तांदूळ पाठवण्यासाठी शिपमेंट कोटा दिला जाईल.

हे निर्यातदार गुरुवारपासून दि. ३० जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतील. किमान ८,००० टन समुद्रमार्गे पाठवू शकतील.  "निर्यातदारांनी किमान मर्यादेपेक्षा जास्त रकमेसाठी अर्ज केला तरच अर्जाला परवानगी दिली जाईल," असे त्यात म्हटले आहे.

खरीप हंगामात, तांदूळाचे २०२१ मधील ११ हजार १०० कोटी टन उत्पादन झाले होते. ते २०२२ मध्ये घटून १0 हजार ८०७ कोटी टन उत्पादन झाले.  पण, यंदा कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार तांदूळ उत्पादन विक्रमी १३ हजार ५५४ कोटी टन इतके नोंदवले गेले आहे.

निर्यातदारांना दिलेली परवानगी 31 डिसेंबरपर्यंत वैध असेल आणि त्यांना तुकडा तांदूळाच्या वाटप केलेल्या कोट्याची निर्यात पूर्ण झाल्यानंतर एक महिन्याच्या आत लॅन्डेट सर्टिफिकेट सादर करावे लागेल.

यापूर्वी फेब्रुवारीमध्ये, केंद्राने शिपमेंटवर बंदी असताना विशेष विचार म्हणून सेनेगलला २.५  लाख टन तुकडा तांदूळ आणि एक लाख टन तांदूळ गांबियाला निर्यात करण्यास मान्यता दिली होती. याव्यतिरिक्त, जिबूतीला ९ हजार ९०० टन तुकडा तांदूळ परवानगी दिली.

गेल्यावर्षी पूर्वेकडील मुख्य भात पिकवणार्‍या राज्यांमध्ये खरीप हंगामात मान्सून कमी पडल्याने केंद्राने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. तसेच पांढऱ्या आणि तपकिरी तांदळाच्या शिपमेंटवर २० टक्के शुल्क लावले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com