Raisins
Raisins  
मार्केट इन्टेलिजन्स

Raisin Export : बेदाणा उत्पादनात पाचव्या, निर्यातीत दहाव्या स्थानावर

सुदर्शन सुतार

सोलापूर ः जगभरातील बेदाणा उत्पादक (Raisin Production) देशात भारताचे स्थान पाचव्या स्थानावर असूनही, निर्यातीत (Raisin Export) मात्र भारत तब्बल दहाव्या स्थानावर आहे. उत्पादनामध्ये प्रामुख्याने टर्की, अमेरिका, इराण आणि चीनशी भारताची स्पर्धा आहे. गेल्या पाच वर्षांत भारताने उत्पादनातील आपले स्थान पहिल्या पाचमध्ये कायम ठेवले आहे. पण निर्यातीतील दहावे स्थान मात्र काही केल्या पुढे सरकलेले नाही. दरवर्षी अवघ्या तीन टक्क्यांपर्यंतच बेदाण्याची निर्यात होते आहे.

बेदाणा उत्पादन घेणाऱ्या प्रमुख देशांमध्ये भारतासह टर्की, अमेरिका, इराण, चीन, दक्षिण आफ्रिका, उझबेकिस्तान, चिली, अर्जेंटिना या देशांचा समावेश होतो. यामध्ये भारत पाचव्या स्थानावर आहे. दरवर्षी जगभरात १३ लाख टनांहून अधिक बेदाणा उत्पादन होते. विशेष म्हणजे जगभरात होणाऱ्या बेदाण्याच्या तुलनेत भारतीय बेदाणा गुणवत्ता आणि दर्जाच्या बाबतीत उत्कृष्ट आहे.

बाजारात मोठी संधी भारतीय बेदाण्याला मिळू शकते. पण निर्यातीतील घसरत्या टक्यांच्या कारणाचा शोध घेणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षात दोन लाख ९० हजार टनापर्यंतचे उत्पादन घेत टर्की हा कायम पहिल्या स्थानावर राहिला आहे. त्यानंतर अमेरिका दोन लाख नऊ हजार टन उत्पादन घेत दुसऱ्या स्थानावर, इराण एक लाख ७३ हजार टन, चीन १ लाख ७२ हजार टन उत्पादन घेत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे, तर भारत एक लाख ४५ हजार टनापर्यंतचे उत्पादन घेत पाचव्या स्थानावर आहे.

...म्हणून निर्यातीत पिछाडी

देशांतर्गत बाजारातील दर आणि निर्यातीतील दरात फारशी तफावत नसल्याने निर्यातीपेक्षाही देशांतर्गत बाजारातच अधिक चांगले दर मिळत असल्याने निर्यातदार निर्यातीसाठी फारशी उत्सुकता दाखवत नसल्याचे सांगण्यात येते.

सध्या देशांतर्गत बाजारात पहिल्या प्रतीच्या बेदाण्याला प्रतिकिलो १७५ ते २२० रुपये, दुसऱ्या प्रतीच्या बेदाण्याला १४० ते १६० रुपये आणि तिसऱ्या प्रतीच्या बेदाण्याला ६० ते ८० रुपये असा दर आहे. सध्या दिवाळीच्या तोंडावर बेदाण्याची खरेदी जोरात सुरू आहे. या महिनाअखेरपर्यंत खरेदीचा हंगाम चालतो.

सध्या देशांतर्गत बाजारातील हेच दर सर्वाधिक मागणी असणाऱ्या आखाती देशातही आहेत. शिवाय पहिल्या प्रतिपेक्षाही तिसऱ्या प्रतीच्या बेदाण्याला तिथे अधिक पसंती दाखवली जाते, तर भारतात तिसऱ्या प्रतीच्या बेदाण्यालाही चांगला दर मिळतो, साहजिकच, निर्यातीसाठी बेदाणा मिळत नाही, ही काही कारणे निर्यातीच्या अडसरीमागे सांगितली जातात.

निर्यातीचा वाटा तीन टक्के

गेल्या पाच वर्षांतील निर्यातीची तुलना करता दरवर्षी टर्कीने सरासरी २ लाख ६० हजार ७७४ टन निर्यात करत निर्यातीत सर्वाधिक ३२ टक्के वाटा मिळवला आहे. त्यानंतर अमेरिकेने ७० हजार ६४२ टन निर्यात करत ११ टक्के, इराणने ७० हजार ६४२ टन निर्यात करत नऊ टक्क्यांपर्यंत, उझबेकिस्तानने ६६ हजार ९६२ टन निर्यात करत आठ टक्के, चिलीने ५४ हजार ७८५ टन निर्यात करत ७ टक्के वाटा मिळवला आहे. तर दक्षिण आफ्रिका सात टक्के, अफगाणिस्तान पाच टक्के, अर्जेंटिना, चीनने चार टक्के आणि त्या पाठोपाठ भारताने २५ हजार ८८३ टन निर्यात करत अवघ्या तीन टक्क्यापर्यंतचा वाटा मिळवला आहे.

सध्या बेदाण्याच्या खरेदीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. दरात फारसा चढ-उतार नाही, दर स्थिर आहेत. निर्यातीच्या तुलनेत देशांतर्गत बाजारातच दरवर्षी चांगला उठाव मिळतो, त्यामुळे निर्यातीसाठी फारसा बेदाणा जात नाही. यंदाही तीच परिस्थिती राहील, असे वाटते.
सचिन भोसले-गवळी, बेदाणा उत्पादक व निर्यातदार, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT