Tur Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Export : भारताला कितीही तूर निर्यात करा

Tur Market Update : देशात सध्या तुरीचे भाव तेजीत आहेत. त्यातच खरिपात आतापर्यंत तूर लागवड १६ टक्क्यांनी पिछाडीवर दिसते. मॉन्सूनच्या उरलेल्या काळात कमी पाऊस राहू शकतो.

Team Agrowon

Pune News : देशात सध्या तुरीचे भाव तेजीत आहेत. त्यातच खरिपात आतापर्यंत तूर लागवड १६ टक्क्यांनी पिछाडीवर दिसते. मॉन्सूनच्या उरलेल्या काळात कमी पाऊस राहू शकतो. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोझांबिकमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या माध्यमातून येथील निर्यातदारांना तूर आयातीबाबत आश्‍वस्त केले. भारत मार्च २०२४ पर्यंत कोणत्याही निर्बंधाशिवाय तूर आयात करेल, असे उच्चायुक्तालयाने मोझांबिकमधील निर्यातदारांना सांगितले.

देशात सध्या तुरीचे भाव तेजीत आहेत. तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशात चालू हंगामात तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली. यामुळे पुरवठा कमी राहून दर वाढले.

तुरीचा पुरवठा वाढीसाठी सरकारने अनेक निर्णय घेतले. सरकारने मुक्त तूर आयातीला ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली. साठवणूक मर्यादा लावली. बाजारावर बारीक लक्ष ठेवले. पण देशात पुरवठाच कमी असल्याने बाजारावर फारसा काही परिणाम दिसला नाही. यामुळे भाव तेजीतच आहेत

पुरवठा वाढल्याशिवाय तुरीचे भाव कमी होणार नाही, याची जाणीव सरकारलाही होती. त्यामुळे खरीप लागवडीच्या काळात शेतकऱ्यांना तूर पेरण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने घेतला. सरकारने लागवडीच्या काळात शेतकऱ्यांना हमीभावाने सरकारला तूर विक्रीवरील मर्यादा काढली.

आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण उत्पादनाच्या केवळ २५ टक्के आणि सरकारने विनंती केल्यास ४० टक्के माल सरकारला हमीभावाने विकता येत होता. पण सरकारने ही मर्यादा काढून शेतकरी आपला संपूर्ण माल सरकारला विकू शकतात, असा बदल केला.

लागवड घटल्याने चिंता

यंदा पावसाने सरकारच्या मनसुब्यावर पाणी फेरले. जूनमध्ये देशातील बहुतांश भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊसच झाला नाही. यामुळे पेरण्या रखडल्या. तूर हे सहा ते सात महिन्यांचे पीक आहे. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी यंदा तूर लागवड कमी केली.

ताज्या आकडेवारीनुसार देशात ३१ लाख ५१ हजार हेक्टरवर तूर लागवड झाली. सध्याची लागवड गेल्या वर्षी याच काळातील लागवडीपेक्षा १६ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. यामुळे सरकारच्या उद्देशाला सुरुंग लागला. त्यामुळे सरकारने तूर आयात वाढीसाठी आता पुन्हा कंबर कसली.

मोझांबिकमधील तूर काढणी सुरू

आफ्रिकेतील देशांमध्ये चालू महिन्यात तूर काढणी सुरू होईल. पुढील महिन्यापासून भारतात माल पोहोचेल. मोझांबिक हा महत्त्वाचा तूर उत्पादक देश आहे. येथील निर्यातदारांनी जास्तीत जास्त तूर निर्यात करावी, यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहेत.

भारतीय उच्चायुक्तालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, भारत आणि मोझांबिकमध्ये तूर आयातीचा द्विपक्षीय करार झालेला आहे. त्यानुसार मोझांबिक भारताला दोन लाख टन तूर निर्यात करेल. पण भारत सरकारने आता मात्रात्मक बंधन काढून टाकली आहेत. त्यामुळे निर्यातदार भारताला कितीही तूर निर्यात करू शकतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT