Tur Market : अकोल्यात तुरीचा सरासरी दर साडेनऊ हजारांवर

Tur Market Rate : गेल्या काही दिवसांपासून तुरीच्या दरात सुधारणा दिसत आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची ७००० ते १० हजार रुपयांपर्यंत विक्री होत आहे.
Tur Market
Tur MarketAgrowon

Akola News : गेल्या काही दिवसांपासून तुरीच्या दरात सुधारणा दिसत आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची ७००० ते १० हजार रुपयांपर्यंत विक्री होत आहे. मंगळवारी (ता. १) तुरीला कमाल दर १०१९५ रुपये मिळाला तर सरासरी ९७०० रुपये भाव होता.

गेल्या हंगामातील तुरीची सध्या आवक सुरू आहे. सततच्या पावसाळी वातावरणामुळे व यापूर्वी बराच माल विक्री झालेला असल्याने बाजारात तुरीची आवक कमी झाली आहे. सध्या मागील काही दिवसांत २०० पोत्यांच्या आतच आवक होत आहे. नवीन तुरीचे पीक आता साधारणतः एक महिना कालावधीचे झालेले आहे.

Tur Market
Tur Market : तूर उत्पादनात यंदाही मोठ्या वाढीची आशा धुसरच

नवीन तूर बाजारात यायला आणखी चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे. अशात बाजारात मागणी असल्याने तुरीला चांगला दर मिळतो आहे. तर डाळवर्गीय हरभऱ्याचा दरसुद्धा सरासरी ४५०० पर्यंत मिळतो आहे. बाजारात अडीचशे पोत्यांच्या आत हरभऱ्याची आवक होत आहे.

Tur Market
Tur Market: तुरीचे भाव तेजीत असूनही लागवड १८ टक्क्यांनी पिछाडीवर

सोयाबीनदर सरासरी साडेचार हजारांपर्यंत

अकोला बाजार समितीत सध्या केवळ सोयाबीनची सर्वाधिक आवक सुरू आहे. मंगळवारी १६०८ पोत्यांची आवक झाली होती. सोयाबीन या एकमेव शेतमालाची मोठी आवक आहे. बाजारात सोयाबीनला किमान ४१०० व कमाल ४८७५ रुपयांचा भाव मिळाला. सरासरी ४८०० रुपये दराने विक्री झाली.

तीळ पोहोचला १६ हजारांवर

बाजारात प्रामुख्याने तीळ सर्वाधिक भाव मिळवत आहे. बाजार समितीत तिळाची अवघी चार पोत्यांची आवक झाली होती. या तिळाला १६२२५ रुपयांचा दर मिळाला. गेल्या आठवड्यात २८ जुलैला तीळ उच्चांकी १६४०० रुपये सरासरी दराने विक्री झाला होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com