Soybean Market Update मागच्या आठवड्यापासून सोयाबीनचे किमान दर पाच हजार रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. खरीप हंगामाच्या (Kharif season) पार्श्वभूमीवर बियाण्यासाठी मागणी (Seed Demand) वाढल्याने शनिवारी (ता. ६) हिंगोली धान्य बाजारामध्ये सोयाबीनच्या कमाल दरामध्ये किंचित सुधारणा झाली. मागणी वाढल्यास दरात तेजी येऊ शकते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारात (भुसार माल मार्केट) शनिवारी (ता. ६) सोयाबीनची ५०० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला किमान ४९०० ते कमाल ५१९५ रुपये तर सरासरी ५०४७ रुपये दर मिळाले, अशी माहिती
बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
हिंगोली धान्य बाजारात मंगळवार (ता.२) ते शनिवार (ता.६) या कालावधीत सोयाबीनची १८४० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला किमान ४८०० ते कमाल ५१९५ रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.४) ४०० क्विंटलची होऊन प्रतिक्विंटल किमान ४८५० ते कमाल ५१३० रुपये तर सरासरी ४९९० रुपये दर मिळाले.
बुधवारी (ता.३) ३९० क्विंटलची आवक झाली. तर दर किमान ४८०० ते कमाल ५१११ रुपये तर सरासरी ४९५८ रुपये मिळाले. मंगळवारी (ता. २) सोयाबीनची ५५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५१०० रुपये तर सरासरी ४९५० रुपये दर मिळाले.
सेनगाव बाजार समितीत ९० क्विंटल आवक
सेनगाव बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता. ५) सोयाबीनची ९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४००० ते कमाल ५८०० रुपये तर सरासरी ४५०० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता.३) ८० क्विंटल आवक झाली. त्या वेळी किमान ३९०० ते कमाल ५००० रुपये तर सरासरी ४५०० रुपये दर मिळाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.