Silk Cocoon  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Silk Cocoon Production : रेशीम कोश उत्पादनात यंदा १५२ टनांची वाढ

Team Agrowon

Nagpur News : राज्याने कोश उत्पादनात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल १५२ टनांची वाढ नोंदविली आहे. गेल्यावर्षी ६४० टन कोश उत्पादन झाले होते तर यंदा कोश उत्पादन ७९२ टनांवर पोहोचले आहे. त्यावरूनच कोश उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढता असल्याचे सिद्ध होते, अशी माहिती रेशीम संचलनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी दिली.

राज्यात पारंपरिक पिकाच्या तुलनेत रेशीम शेतीत असलेली कमी जोखीम आणि तुलनेत वर्षभरात अनेक बॅचेसच्य माध्यमातून मिळणारे उत्पन्न या कारणामुळे शेतकऱ्यांची रेशीम शेतीला पसंती वाढत आहे.

त्यामुळेच गेल्या वर्षी ७ लाख ३८ हजार अंडीपुंजांपासून ६४० टन कोश उत्पादन करण्यात आले होते. यंदा जूनपर्यंत ९.३४ लाख अंडीपुंचांच्या वाटपातून सुमारे ७९२ टन कोश उत्पादकता झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत १५२ टनांची वाढ कोश उत्पादकतेत यंदा नोंदविण्यात आली असून हा एक विक्रमच ठरला आहे. जालना कोश विक्री बाजारपेठेत ३५० ते ५०० रुपये प्रतिकिलोचा दर कोश उत्पादकांना मिळाला. मात्र सध्या पावसाचे दिवस असल्याने शेतकऱ्यांनी फॅनच्या हवेत कोश वाळवून ते विक्रीसाठी नेले पाहिजेत, असा सल्ला श्री. ढवळे यांनी दिला.

वातावरणातील ओलावा कोश शोषून घेतात. त्यामुळे त्याचे वजन वाढते. परिणामी दर्जाअभावी दर कमी मिळत असला तरी वजनातील वाढीमुळे उत्पन्नाची सरासरी गाठणे शक्‍य होते. पारंपरिक पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. त्याच्या काढणी, मळणी आणि विक्रीसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागेल. मात्र इतक्‍या कालावधीत कोश उत्पादकांना उत्पन्न होते.

अदमापूर (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील विनोद पेंटे (पाटील) यांनी तुतीची वृक्ष पद्धतीने लागवड केली. सुरुवातीला या पिकातील मोकळ्या जागेत त्यांनी आंतरपीक घेतले. त्यानंतर ४०० अंडीपुंजांचे संगोपन करून ३ क्‍विंटल २२ किलो कोश उत्पादकता त्यांना मिळाले. ४३४ रुपये दराने पूर्णा (परभणी) कोश मार्केटमध्ये याची विक्री करून १ लाख ४० हजारांचे उत्पन्न त्यांना झाले. इतर शेतकऱ्यांचे पीक निघण्यापूर्वीच त्यांच्या हातात पैसा आला. अशाप्रकारे १२ महिन्यांत १२ वेळा उत्पन्न मिळविणे शक्‍य होते. त्याकरिता सुयोग्य व्यवस्थापनावर भर हवा.
- महेंद्र ढवळे, उपसंचालक, रेशीम संचलनालय, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT