Betel Leaf  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Betel Leaf Rate : खाऊच्या पानांच्या दरात वाढ

Betel Leaf Market : गणेशोत्सवात पूजेसाठी खाऊच्या पानांना मागणी असून उठावही होतो. त्यामुळे पानांच्या बाजारपेठांत खाऊच्या पानांची मागणी वाढली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : गणेशोत्सवात पूजेसाठी खाऊच्या पानांना मागणी असून उठावही होतो. त्यामुळे पानांच्या बाजारपेठांत खाऊच्या पानांची मागणी वाढली आहे. मागील पंधरा दिवसांपेक्षा गेल्या चार दिवसांत पानांच्या दरात प्रति डागाला १००० ते २००० हजार रुपयांनी सुधारणा झाली आहे. त्यामुळे पान उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून दर टिकून राहण्याची शक्यताही शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. सध्या खाऊच्या पानाला प्रतिडाग ४००० ते ६००० हजार रुपये दर मिळत आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भागातील पानांची विक्री जूनपासून वाढली. या दरम्यान, पानांचा चांगली मागणी असल्याने उठावही झाला असल्याने दरही अपेक्षित दर मिळाले होते. त्यानंतर जुलैच्या मध्यापर्यंत पानांचे दर टिकून असल्याने पान उत्पादक शेतकऱ्यांनी घातलेला पैसा पदरी पडेल अशी आशा होती. मात्र जून आणि जुलैमध्ये अतिवृष्टी झाली. त्याचा फटका पान मळ्यांना बसला. परिणामी उत्पादनात ४० टक्क्यांनी घट आली.

श्रावणात पुजेसाठी खाऊच्या पानांना सर्वाधिक मागणी असते. त्यानुसार पानांच्या विक्रीचे नियोजन शेतकरी करत असतो. परंतु पानांच्या बाजारपेठेत श्रावणात पानांची मागणी कमी झाली. याचा परिणाम दरावर झाल्याने श्रावणात सुमारे ४० टक्क्यांनी दरात घट झाली होती. परिणामी पान उत्पादक शेतकरी हतबल झाला होता.

गुजरात, मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, लातूर, सोलापूर, सिंधूदुर्ग, खेड, दापोली, कोल्हापूर या पानांच्या बाजारपेठेत पानांची आवक कमी अधिक होती. परंतु उठाव कमी होता. त्यामुळे ऑगस्टमध्ये पानांचे दर दबावात होते. गेल्या पंधरा दिवसापूर्वी कळी पानाला २००० ते ३००० डाग (एका डागात १२ हजार पाने) असा दर होता.

गणेशोत्सवात पुजेसाठी पानांना मागणी असल्याने सांगली जिल्ह्यातून सुमारे १० ते १५ हजार डप्पा (एका डप्प्यात ३ हजार पाने) पानांच्या बाजारपेठेत विक्रीला जाऊ लागले आहेत. पानांच्या आवकेत वाढ झाली असली तरी, उठावही असल्यामुळे चार दिवसांपूर्वी पानांच्या दरात वाढ झाली आहे. सध्या कळी पानाला ४००० ते ५००० तर फापडा पानाला ५००० ते ६००० (एका डागात १२ हजार पाने) असा दर मिळत आहे. पंधरा दिवसांपेक्षा सद्यःस्थितीला दरात १००० ते २००० रुपयांनी वाढ झाल्याने पान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गणपती सणामुळे पानांची मागणी वाढली आहे. त्यामुळे गेल्या पंधरावड्यापेक्षा सध्या पानांचे दर तेजीत आहेत. पंधरा दिवस दर टिकून राहतील असा अंदाज आहे.
संदीप कणसे, पान व्यापारी, बेडग, ता. मिरज
गणपतीत दहा दिवसच बाजारपेठेत मागणी असते. त्यामुळे पानांचा चांगले दर मिळतात. परंतु त्यानंतर दसरा सण आहे. त्यामुळे या दरम्यान, दर कसे राहतील हे सांगणे कठीण आहे. मात्र, पावसामुळे पानमळ्यांचे नुकसान झाले असल्याने दिवाळीनंतर बाजारत पानांची आवक कमी होईल, असा अंदाज आहे.
प्रभाकर नागरगोजे, पान उत्पादक शेतकरी, नरवाड, ता. मिरज.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

Agriculture Crisis: दिल्लीतील घोषणा अन् शिवारातील वेदना

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

SCROLL FOR NEXT