Soybean Rate
Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयाबीन, मुगाच्या किमतींत वाढ

अरूण कुलकर्णी

१५ सप्टेंबर रोजी संपणाऱ्या पंधरवड्यात, गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत, कापूस (Cotton), मका (Maize) व सोयाबीन (Soybean Arrival) यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. याउलट मूग, तूर व टोमॅटो यांच्या आवकेत मोठ्या प्रमाणात घट झाली.

कापसाच्या किमती याही सप्ताहात घसरल्या. सोयाबीनच्या किमती मात्र या सप्ताहात ५ टक्क्यांनी वाढल्या. मुगाची नवीन पिकाची आवक पावसामुळे खंडित झाली. किमती त्यामुळे वाढत आहेत. या सप्ताहात त्या ९ टक्क्यांनी वाढल्या. कांदा व टोमॅटोच्या किमतींनीसुद्धा वाढ अनुभवली.

या सप्ताहातील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) ऑगस्ट महिन्यात वाढत होते. या महिन्यात मात्र ते घसरत आहेत. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ५.७ टक्क्यांनी घसरून रु. ४२,२८० वर आले होते; त्या सप्ताहात ते पुन्हा ५.३ टक्क्यांनी घसरून ४०,०६० वर आले आहेत. ऑक्टोबर डिलिव्हरी भाव ५.९ टक्क्यांनी घसरून रु. ३४,८१० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) ६.७ टक्क्यांनी घसरून रु २,००० वर आले आहेत. नवीन वर्षासाठी कपाशीचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० जाहीर झाले आहेत. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत. हेजिंगसाठी अनुकूल वेळ आहे.

मका

मक्याच्या स्पॉट (गुलाबबाग) किमती ऑगस्ट महिन्यात वाढत होत्या. या सप्ताहात स्पॉट किमती रु. २,५०० वर स्थिर आहेत. फ्यूचर्स (ऑक्टोबर डिलिव्हरी) किमती ०.१ टक्क्याने घसरून रु. २,५१४ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. २,५३४ वर आल्या आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ जाहीर झाला आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत. मक्याला मागणी चांगली आहे.

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. गेल्या सप्ताहात त्या ०.९ टक्क्याने घसरून रु. ७,३७३ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.५ टक्क्याने वाढून रु. ७,४०७ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती २.३ टक्क्यांनी वाढून रु. ७,२५६ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या ०.१ टक्क्याने वाढून रु. ४,६१० वर आल्या आहेत. हमीभाव रु. ५,२३० आहे.

मूग

मुगाच्या किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) या सप्ताहात ९.२ टक्क्यांनी वाढून रु. ७,१०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ जाहीर झाला आहे. सध्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत. गेल्या दोन सप्ताहांत मुगाची आवक पावसामुळे कमी झाली आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) ऑगस्ट महिन्यात उतरत होती. गेल्या सप्ताहात ती २.९ टक्क्यांनी घसरून रु. ५,१९६ वर आली होती. या सप्ताहात मात्र ती ५ टक्क्यांनी वाढून रु. ५,४५५ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) ऑगस्ट महिन्यात घसरत होती. या सप्ताहात ती १.७ टक्क्याने घसरून रु. ६,९६७ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.

कांदा

कांद्याच्या किमती ऑगस्ट महिन्यात रु. १,२५० च्या आसपास चढ-उतार अनुभवत होत्या. कांद्याची स्पॉट किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,२२५ होती; या सप्ताहात ती रु. १,२६३ वर आली आहे.

टोमॅटो

टोमॅटोच्या किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. या महिन्यात त्या वाढू लागल्या आहेत. या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) गेल्या सप्ताहाच्या तुलनेने ३८ टक्क्यांनी वाढून रु. १,८१३ पर्यंत आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT