Khandesh Sunflower Sowing: जळगाव : कमी कालावधी व बऱ्यापैकी दर देणारे पीक म्हणून खानदेशात यंदा सूर्यफुलाची पेरणी सुमारे ४००० हेक्टरवर झाली आहे. गेले चार-पाच वर्षे अपवाद वगळता पेरणी होत नव्हती. परंतु यंदा पेरणी वाढली आहे..मागील वेळेस खानदेशात सुमारे साडेतीन हजार हेक्टरवर सूर्यफूल पीक होते. यंदा पेरणी वाढली आहे. कापूस पिकात गुलाबी बोंड अळीने धुमाकूळ घातला. त्यात मका पिकालाही लष्करी अळीने विळखा घातला आहे. मका पीक खर्चिक झाले आहे. तसेच गहू पिकाला अधिकचे पाणी द्यावे लागते. तर बाजरी, कांदा पिकात दरांची शाश्वती नाही. अशा स्थितीत धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील यावल, चोपडा, जामनेर या भागात काही शेतकरी सूर्यफुलाकडे वळले आहेत. .Sunflower Cultivation: नियोजन उन्हाळी सूर्यफूल लागवडीचे....सूर्यफूल पेरणीत जळगाव, धुळे जिल्हा १० ते १५ वर्षांपूर्वी आघाडीवर होते. परंतु कमी दर व इतर कारणांमुळे सूर्यफुलाची पेरणी कमी झाली. अनेक भागात पीक निसवले आहे. तर काही भागात पीक पक्व होत आहे. पेरणी यंदा डिसेंबर, जानेवारीत झाली आहे. काहींनी नोव्हेंबरमध्येही पेरणी केली. यामुळे पेरणीची आकडेवारी सतत वाढली..Sunflower Farming: उन्हाळी सूर्यफुलाचे उत्पादन वाढवण्यासाठी लागवड तंत्र .मध्यंतरी सूर्यफूल पेरणीची नोंदही दिसत नव्हती. परंतु अलीकडे आलेले चांगले वाण, दरांची हमी, सिंचनाची गहू, मक्याच्या तुलनेत कमी गरज व कमी खर्च यामुळे सूर्यफूल पेरणीला यंदा बरा प्रतिसाद दिसत आहे. पेरणी धुळ्यातील शिरपुरात सुमारे ४०० हेक्टरवर आहे. तसेच जळगावमधील चोपडा, यावल, जामनेरातही मिळून सुमारे १५०० हेक्टर क्षेत्र आहे. तसेच इतर भागातही पेरणी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आगाप पेरणी केली आहे. मळणीनंतर ओल्या सूर्यफूल पिकास चांगले दर मिळण्याची स्थिती सध्या आहे. एकरी चांगला नफा सुटेल, असे चित्र सध्या आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.