Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी आता विविध पिकांची लागवड करून प्रयोशशिल शेतीकडे वळाले आहेत. ‘ब्रोकली’ या भाजीपाला पिकाचा प्रयोग धडगाव तालुक्यातील कात्री भूजगाव, खरवड, उमराणी या गावांमध्ये यशस्वी झाला आहे. .शेतकरी बांधवांने ‘ब्रोकोली’ पिकाच्या उत्पन्नातून मोठा नफा मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जिवनात आर्थिक भरभराट येण्यास मदत होत आहे. मोठ्या प्रामाणावर जीवनसत्वे असलेल्या ‘ब्रोकोली’चा आहारात समावेश केला जातो. या पिकाचा प्रयोग यशस्वी झाल्याने शेतकऱ्यांना प्रगतीची नवी वाट सापडली आहे..Broccoli Production: उच्च पोषकतायुक्त ब्रोकोलीचे उत्पादन .नंदुरबार येथील डॉ. हेडगेवार सेवा समिती व कृषि विज्ञान केंद्र यांच्यामार्फत भारतीय कृषी अनुसंधान परिषद प्रायोजित ‘निक्रा’ हा प्रकल्प धडगाव तालुक्यात राबविला जात आहे..Broccoli Production: उच्च पोषकतायुक्त ब्रोकोलीचे उत्पादन .या प्रकल्पांतर्गत खरीप आणि रब्बी या हंगामात हवामान अनुकूल, कमी पाण्यात येणारे तसेच रोग आणि किडीस बळी न पडणारे, कमी कालावधीत येणाऱ्या पिकाचे प्रयोग केले जातात..रब्बी पीक म्हणून ‘ब्रोकोली’ भाजीपाला पिकांची लागवड खरवड, धनाजे, भुजगाव येथे करण्यात आली. धडगाव तालुक्यात यंदा प्रथमच बायोफोर्टीफिएड वाणाची लागवड करण्यात आली. हे वाण मानवी शरीरातील कमतरता ओळखते. यामध्ये जांभळी फुलकोबी, केशरी फुलकोबी, ब्रोकोली, नवलकोल या वाणाचे प्रयोग करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.