Namo Shetkari Yojana 8th Installment: अमरावती : राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा आठवा हप्ता अद्याप जमा न झाल्याने अमरावती जिल्ह्यातील तब्बल २ लाख ८४ हजारांहून अधिक शेतकरी प्रतीक्षेत आहेत. सातवा हप्ता सहा महिन्यांपूर्वी वितरित झाला होता. त्यानंतर आठव्या हप्त्याबाबत कोणतीही हालचाल नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे..या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या ‘पीएम किसान’ योजनेचा डेटा वापरला जातो. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असूनही निधी जमा न झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून तांत्रिक अडचणींचा मुद्दा पुढे केला जात असला तरी प्रत्यक्षात निधी उपलब्धतेचा प्रश्न असल्याची चर्चा आहे. केंद्र सरकारकडून हप्ता जमा झाल्यानंतर तत्काळ राज्याचा हिस्सा वितरित होतो, अशी पद्धत आहे. मात्र यंदा वितरणात विलंब होत असल्याने निधीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे..Namo Installment : अडीच महिने उलटूनही नमोचा हप्ता मिळेना.जिल्ह्यातील सद्यस्थितीजिल्ह्यात एकूण २,९१,५०० शेतकरी खातेदार योजनेस पात्र आहेत. त्यापैकी २,८४,७७६ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, म्हणजेच सुमारे ९८ टक्के पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र अद्याप ७,०२४ खाते प्रलंबित आहेत.दरवर्षी सहा हजार रुपयांची अतिरिक्त मदत राज्य सरकारकडून दिली जाते. आठवा हप्ता न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या नियोजित खर्चावर परिणाम होत आहे. रब्बी हंगामातील खत, बियाणे आणि कीडनाशकांसाठी ही रक्कम उपयोगी पडते. विशेषतः कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने या निधीकडे अपेक्षेने पाहत आहेत..Namo 8th Installment: नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ह्प्ता का मिळत नाही?.तालुकानिहाय ई-केवायसी केलेले शेतकरीअचलपूर २३,४७५अमरावती ९६,१७७अंजनगाव सुर्जी २०,०३१भातकुली १९,६४६चांदूर रेल्वे १४,३४९चांदूर बाजार १४,५६५चिखलदरा ११,४७३दर्यापूर २५,२७०धामणगाव रेल्वे १८,७८७धारणी १६,९२३मोर्शी २५,४५८नांदगाव खंडेश्वर २२,३२०तिवसा १७,०६२वरुड २७,९११.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.