Edible Oil
Edible Oil Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Edible Oil Import : पामतेल आयातशुल्कात वाढ करावी : एसईची मागणी

Team Agrowon

Edible Oil Rate : केंद्र सरकारने गेल्या हंगामात खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी खाद्यतेल आयातशुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशात विक्रमी खाद्यतेल आयात झाली.

त्यात पामतेलाचे प्रमाण जास्त आहे. देशातील मोहरी आणि सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारने पामतेल आयातशुल्कात वाढ करण्याची मागणी केली.

मागील वर्षी देशात खाद्यतेलाच्या दरात मोठी तेजी आली होती. त्यातच महागाईचा भडका उडाल्याने केंद्र सरकारने खाद्यतेल आयातीवरील शुल्कात कपात केली होती. पण आता आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात नरमाई आली.

तसेच देशात तेलबिया उत्पादनात वाढ झाली. त्यामुळे तेलबियाचे दर दबावात आले. देसातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पामतेल आयात शुल्कात वाढ करावी, अशी मागणी साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईए आणि सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि सोपाने केली आहे.

देशात यंदा मोहरी उत्पादन विक्रमी पातळीवर पोचेल, असा अंदाज सरकारने व्क्त केला. पण सध्या खाद्यतेल आयात वाढल्याने मोहरीचे दर दबावात आहेत. मोहरीचे दर हमीभावाच्याही खाली आले, असे.एसईए आणि सोपाने म्हटले आहे.

मोहरी उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्राने पामतेल आयातशुल्कात वाढ करावी आणि तर नाफेड आणि इतर संस्थांनी हमीभावाने खरेदी करावी, अशीही मागणी या संस्थांनी केली.

देशातील मोहरी पिकाची काढणी आता वेगाने सुरु होत आहे. त्यामुळे मोहरीचे दर हमीभावापेक्षा नरमले आहेत. केंद्राने यंदा मोहरीसाठी ५ हजार ४५० रुपये हमीभाव जाहीर केला.

पण राजस्थान आणि हरियानामध्ये मोहरी उत्पादक भागांमध्ये मोहरीला प्रतिक्विंटल ५०० ते ७०० रुपयाने कमी भाव मिळत आहेत. सध्या मोहरीला ४ हजार २०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत.

देशातील तेलबिया उत्पादकांना दिलासा देण्यासाठी पामतेल आयातीत वाढ करणे आवश्यक आहे. मोहरी उत्पादकांना हमीभाव मिळण्यासाठी सरकारने तातडीने पामतेल आयाशुल्क वाढवावे.
भारत मेहता, कार्यकारी संचालक, साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT