Bogus Fertilizer  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bogus Fertilizer : बोगस खत प्रकरणी दिखाव्यापुरती कारवाई नको

सोलापूर जिल्ह्यात बोगस विद्राव्य खत विक्रीचा प्रकार उघड झाल्यानंतर आणि ‘अॅग्रोवन’ने या प्रकरणाची पोलखोल सुरू केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात बोगस विद्राव्य खत (Bogus Fertilizer) विक्रीचा प्रकार उघड झाल्यानंतर आणि ‘अॅग्रोवन’ने या प्रकरणाची पोलखोल सुरू केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली असून, संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील (Sachin Patil) यांनी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन देत बोगस खत विक्रेत्यांवर (Bogus fertilizer Seller) दिखाव्यापुरती कारवाई करू नका, ठोस कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बोगस खत विक्रीबाबत ‘अॅग्रोवन’ने गेल्या तीन दिवसांपासून ‘शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ’ ही विशेष वृत्तमालिका लावून या विषयाची पोलखोल सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यामध्ये भेसळयुक्त खते बियाणे, कीटकनाशके विक्रीचे पेव फुटले आहे. या भेसळयुक्त खते-बियाणे कीटकनाशकांमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे.

त्यानंतर आवाज उठवल्यानंतर कुठेतरी तुटपुंजी कारवाई करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातो, सापडेल तोच चोर, अशी कारवाई कृषी विभाग करत आहे, कृषी विभाग व कृषी अधिकारी आर्थिक हितसंबंध जोपासून अशा कंपन्यांना मोकाट सोडून देताना दिसत आहे. त्यामुळे भेसळयुक्त खते व बियाणे कीटकनाशके विक्रेत्यांना कुणाचीही भीती राहिली नाही, कृषी विभाग कूच कामी ठरत आहे. त्यामुळे तहसील प्रशासनाकडून तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात यावे आणि तालुक्यातील सर्व खते-बियाणे, कीटकनाशके विक्री करणारे दुकानदार, खतनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर अचानक धाडी टाकून तपासणी करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

युरियाची जाणीवपूर्वक टंचाई

सध्या पंढरपूर तालुक्यांमध्ये युरियाची टंचाई दाखवली जात आहे. त्यामुळे अनेक खत दुकानदार चढ्या दराने खत विक्री करत आहेत. युरिया पाहिजे असेल, तर इतर खते घेतल्याशिवाय युरिया मिळणार नाही, अशा प्रकारे शेतकऱ्याची अडवणूक करताना दिसत आहेत, अशा दुकानदारांकडे सुद्धा डमी ग्राहक पाठवून त्यांना पकडून योग्य ती कारवाई करावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.

दिखाव्यापुरती कारवाई करू नका, जो सापडेल तो चोर अशी कारवाई सुरू आहे, पण त्याच्या मुळाशी जाऊन दोषींवर ठोस कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू.
सचिन पाटील, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पंढरपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT