Fish Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Fish Rate: सुक्या मासळीच्या दरात सुधारणा

Seafood Price Hike: सिंधुदुर्गात ताज्या मासळीच्या कमतरतेमुळे सुक्या मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे सोड्यासह विविध प्रकारच्या मासळीच्या दरात झपाट्याने सुधारणा होत असून, सोड्याला किलोला १६०० रुपये पर्यंत दर मिळत आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताजा मासळीच्या दरात सुधारणा झाल्यानंतर आता सुक्या मासळीच्या दरात देखील सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे. सर्वाधिक मागणी सोड्याला असून प्रति किलो १२०० ते १६०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

पावसाळ्यात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत समुद्रात मासेमारीला बंदी असते. या कालावधीकरिता कोकणात सुक्या मासळीचा वापर अधिकतर केला जातो. याशिवाय नियमित आहारात देखील बहुतांश लोक मासळीचा वापर करतात. एप्रिल, मे महिन्यात सुकी मासळी खरेदीला सुरुवात होते.

जून, जुलै या दोन महिन्यांकरिता साठवणूक करून ही मासळी ठेवली जाते. गेल्या आठवड्यापासून ताजा मासळीच्या दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता सुक्या मासळीला मागणी वाढल्याने त्याच्या दरातदेखील सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे. मे महिन्यात मुंबईतस्थित कोकणकर मोठ्या प्रमाणात कोकणात येतात. त्यांच्याकडून खरेदीचे प्रमाण वाढते. त्यामुळे दरात आणखी सुधारणा होण्याचा अंदाज आहे.

सध्या सर्वाधिक मागणी सोड्यांना असून प्रति किलो १२०० ते १६०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. साधे सोडे प्रति किलो १००० ते १४०० रुपये, बोंबील ५०० ते ५५० रुपये, बांगडा १००, अंबाडी १००, सुका जवला २५० ते ३०० रुपये, सुकी बेगी ७०० रुपये, सुकी धोडी १०० रुपये, सुकी काड ४४० ते ६४० रुपये, काटेरी सुकी १५० रुपये, सुकी मांदेली १०० रुपये, असे दर सध्या आहेत. या दरांमध्ये आणखी सुधारणा होण्याचा अंदाज आहे.

सध्या ताजी मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून सुक्या मासळीच्या मागणी वाढ झाली आहे. त्यामुळे दरात देखील सुधारणा झाली आहे.
तृप्ती सारंग, मासळी विक्रेती, म्हापण, ता. वेंगुर्ला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT